ICC Women's WC Sakal
क्रीडा

ICC Women's WC: आफ्रिकेच्या विजयातला 'डायरेक्ट हिट'; पाहा व्हिडिओ

मसाबता क्लासने पॉईंटवरुन डायरेक्ट हीट थ्रो करत तीला रनआऊट केलं.

दत्ता लवांडे

न्युझीलंड : बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषक सामन्यादरम्यान बांग्लादेशच्या फरगाना हूक हिला रनआऊट करत तीला तंबूत पाठवले. मसाबता क्लासने पॉईंटवरुन डायरेक्ट हीट थ्रो करत तीला रनआऊट केलं. ती त्यावेळी ५० च्यी सरासरीने १६ बॉलमध्ये आठ रनावर खेळत होती. तीच्या विकेटनंरत बांग्लादेशची ८५ रन ४ आऊट अशी अवस्था झाली होती.

सध्या न्युझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषादरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश महिलांच्या सामन्यात हा क्षण पहायला मिळाला. बांग्लादेशच्या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. भारती वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजता हा सामना सुरु झाला होता. प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०७ धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान त्यांचे सगळे फलंदाज तंबूत परतले होते. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून कॅपने सर्वाधिक ४२ धावा केल्या.

तीच्या या धावसंखेच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १० बाद २०७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ फक्त १७५ धावा बनवू शकला. यामध्ये शर्मिन अख्तर हीने सर्वाधिक ३४ धावा बनवल्या. बांग्लादेश संघातील एकाही खेळाडूला विशेष कामगिरी करण्यात आली नाही. त्यांचे तीन खेळाडू एकेरी धावसंख्येवर आणि तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. या पडझडीसह बांग्लादेशचा संघ ४९.३ षटकात सर्वबाद १७५ धावा बनवू शकला.

दरम्यान बांग्लादेशच्या फरगाना हूक या खेळाडूला दक्षिण आफ्रिकेच्या मसाबताने धावबाद केलेला क्षण पाहण्यासारखा आहे. तीला रनाऊट केलं त्यावेळी बांग्लादेशचा संघ ८५ रनावर खेळत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ‘एपस्टीन’चा वापर करून सहीसाठी दबाव; भारत-अमेरिका करारावरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर आरोप

Kolhapur Cleaning Cmpaign : दोन बोटींतून नदीतील कचरा बाहेर; आपदा मित्रांच्या धडाकेबाज कामगिरीने बदलला घाटाचा चेहरा

Igatpuri School Accident : इगतपुरीत Little Blossom शाळेच्या आवारात शिक्षकाने विद्यार्थ्याच्या अंगावर घातली कार; CCTV फुटेज पाहिल्यावर पालकांचा संताप

Kolhapur Cleaning Cmpaign : अवघ्या अडीच तासांत दोन टन कचरा हटवला; पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा झळाळून निघाला!

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्त; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

SCROLL FOR NEXT