banw vs indw 2nd odi 
क्रीडा

IND vs BAN : बांगलादेशने जिंकली नाणेफेक! भारतीय महिला संघाचे प्रतिष्ठा पणास, जाणून घ्या प्लेइंग 11

Kiran Mahanavar

Bangladesh Women vs India Women 2nd ODI : बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताविरुद्ध बांगलादेशचे प्रयत्न मोठे लक्ष्य बनवून त्याचा बचाव करण्याचा असेल. बांगलादेशने बचाव करतानाही पहिला सामना जिंकला होता.

भारतीय महिला संघाने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका कधीच गमावली नव्हती; परंतु आता ती वेळ येण्याचा धोका समोर दिसत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतले आव्हान टिकवायचे असेल, तर भारतीय महिलांना आजचा सामना जिंकावा लागेल, हे सत्य असले, तरी सुमार फलंदाजीतून मार्ग काढण्याचा प्रश्न सोडवावा लागणार आहे.

महिला क्रिकेटविश्वात भारतीय संघाचे आशिया खंडात नेहमीच प्राबल्य राहिलेले आहे; पण आत्ताचा बांगलादेश दौरा अडचणीचा ठरत आहे. तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये आहे. यातील पहिले दोन टी-२० सामने जिंकून मालिका जिंकली असली, तरी पुढचा टी-२० आणि पहिला एकदिवसीय सामना असे सलग दोन सामने भारताने गमावले आहेत; पण यापेक्षा गेल्या तीन सामन्यात ढासळलेली फलंदाजी प्रामुख्याने कारणीभूत आहे.

यंदा तर महिला आयपीएलचा अनुभव पाठीशी आहे आणि मायदेशात फिरकीचा सातत्याने सामना करण्याचा असलेला अनुभव, तरीही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघातील फलंदाज बांगलादेशच्या लेगस्पिनरसमोर नांगी टाकत आहेत. इतकेच काय, तर वेगवान गोलंदाज मारुफा अख्तरचे चेंडू खेळतानाही त्रेधातिरपिट उडत आहे.

टी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताने मालिका खिशात टाकली होती; परंतु ८७ धावांचे आव्हान पार करताना आठ फलंदाज बाद झाले होते. तेथूनच फलंदाजांकडून अपेक्षाभंग होत आहे.

बांगलादेशमध्ये वर्ल्डकप

याच बांगलादेशमध्ये पुढील वर्षी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यामुळे येथील खेळपट्ट्यांचा अंदाज आणि आत्मविश्वास मिळवण्याऐवजी भारतीय संघाला अपयशालाच सामोरे जावे लागत आहे. केवळ एक-दोन फलंदाजच नव्हे, तर संपूर्ण संघच निराशा करत आहे.

स्मृतीकडून निराशा

उपकर्णधार आणि काही विक्रम नावावर असलेल्या स्मृती मानधनाचे अपयश विशेष करून अडचणीचे ठरत आहे. भरवशाची शेफाली वर्मा अपयशी ठरली म्हणून प्रिया पुनियाला संधी देण्यात आली; मात्र तिनेही शेफालीचाच कित्ता गिरवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT