Real-Madrid
Real-Madrid 
क्रीडा

रेयाल माद्रिदसमोर बायर्नचे आव्हान

वृत्तसंस्था

बायर्न म्युनिकचे व्यवस्थापक होण्यापूर्वी जुप हेंक्‍स यांच्याकडे रेयाल माद्रिदची सूत्रे होती. आता याच दोन संघांत चॅंपियन्स लीगमधील उपांत्य फेरीची लढत होणार आहे. हेंक्‍स मार्गदर्शक असताना रेयालने चॅंपियन्स लीग विजेतेपदाचा ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. 
प्रतिस्पर्ध्यांतील युरोपीय स्पर्धेतील ही २५ वी लढत आहे. दोन वर्षांपूर्वीच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाचे उट्टे काढण्याची रेयालला संधी आहे. चॅंपियन्स लीग विजेतेपदाची हॅटट्रिक रेयालला खुणावत आहे; पण हेंक्‍स यांनी मार्गदर्शन केलेल्या संघाने किमान चॅंपियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे.


ठिकाण - फुटबॉल एरिना मुनचेन, म्युनिक

आमने-सामने - प्रतिस्पर्ध्यांचे २४ लढतीत प्रत्येकी ११ विजय; मात्र गोलांमध्ये बायर्न ३६-३७ मागे
बायर्नच्या मैदानावर - बारापैकी नऊ लढतीत यजमानांची सरशी; तर दोन लढतीत रेयालची.
प्रतिस्पर्धी संघाच्या देशातील क्‍लबविरुद्ध ः बायर्नने स्पेनमधील संघाविरुद्धच्या ५७ पैकी २६ लढती जिंकताना १८ मध्ये पराभव; तर रेयालचे ६८ लढतीत ३३-२३ वर्चस्व.
होम अँड अवे - बायर्नने घरच्या मैदानावरील स्पेनमधील संघाविरुद्धच्या २७ लढतीत १८-३ वर्चस्व राखले आहे; तर जर्मनीतील ३२ लढतीत रेयालची ६-१९ कामगिरी.

हेही महत्त्वाचे
रेयालने बायर्नविरुद्धच्या गेल्या पाच लढती जिंकल्या आहेत.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचे बायर्नविरुद्ध गेल्या तीन सामन्यांत सात गोल, एकंदरीत सहा सामन्यांत नऊ गोल
बायर्न घरच्या मैदानावरील रेयालविरुद्धच्या गेल्या दोन लढतीत पराजित
बायर्नने गेल्या तीन उपांत्य लढती गमावल्या आहेत, त्याही स्पेनमधील संघाविरुद्धच.
दोन सामन्यांची लढत आणि स्पॅनिश प्रतिस्पर्धी हे समीकरण असताना बायर्नचे १० विजय आणि १० पराभव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT