Indian women cricket team 
क्रीडा

Team India Coach : टीम इंडियाला मिळणार नवीन कोच, 'या' दौऱ्यापासून होणार नियुक्ती

सकाळ ऑनलाईन टीम

Amol Mazumdar India Women's Team Coach : देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे मुंबईचे माजी दिग्गज फलंदाज अमोल मुझुमदार महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. क्रिकेट सल्लागार समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या नावांत मुझुमदार यांना पसंती मिळाली असल्याचे वृत्त आहे.

अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आमि सुलक्षणा नाईक हे सदस्य असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीसमोर मुझुमदार यांनी ९० मिनिटांचे प्रेझेंटेशन सादर केले. यादरम्यान त्यांची मुलाखतही झाली. मुझुमदार यांच्यासह डरहॅमचे या इंग्लिश क्लबचे प्रशिक्षक जॉन लुईस आणि तुषार आरोठे यांच्याही मुलाखती झाल्या. आरोठे हे २०१८ मध्ये महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले आहेत.

भारतीय संघाचा बांगलादेश दौरा सुरू होण्याच्या मुहूर्तावर नवे प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात रमेश पोवार यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आल्यानंतर हे पद रिक्त आहे.

मुझुमदार यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशनवर क्रिकेट सल्लागार समिती फारच प्रभावित झाली. महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी त्यांनी मांडलेले मुद्दे समितीवर प्रभाव टाकणारे ठरले आहेत. इतर दोघांनीही सादर केलेले प्रेझेंटेशन चांगले होते, परंतु मुझुमदार यांनाच पुढच्या प्रशिक्षकपदासाठी पसंती दिली जाईल, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

मुझुमदार हे गत देशांतर्गत मोसमापर्यंत मुंबई संघाचे प्रशिक्षक होते. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स तसेच दक्षिण आफ्रिका संघाचेही सहायक प्रशिक्षक राहिले आहेत. आज झालेल्या मुलाखतीत ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते. इतर दोघांनी ऑनलाईन प्रेझेंटेशन सादर केले. मुझुमदार यांची लगेचच निवड करण्यात आली; तर त्यांची पहिली जबाबदारी बांगलादेश दौरा असेल. या दौऱ्यात भारतीय महिला संघ तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला सामना ९ जुलै रोजी होत आहे. या मालिकेसाठी कालच भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

मुझुमदार यांच्याबरोबर होणारा करार दोन वर्षांचा असू शकेल. पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत बांगलादेशमध्ये ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. तोपर्यंत मुझुमदार यांच्याकडे ही जबाबदारी असू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

भारतीय महिला संघात तंदुरुस्तीवर अधिक काम करावे लागेल. संघातील काही महिलांची तंदुरुस्ती फारच कमी आहे. हा मुद्दा मुझुमदार यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये अधोरेखित केल्याचे समजते.

निवडण्यात आलेले संघ

टी-२० ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री, अमनज्योत कौर, एस. मेघना, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सर्वांनी, मोनिका पटेल, रिषी कनोजिया, अनुशा बारेड्डी, मिन्नू मनी.

एकदिवसीय ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, देविका वैद्य, उमा छेत्री, अमनज्योत कौर, प्रिया पुनिया, पूजा वस्त्रकार, मेघना सिंग, अंजली सर्वनी, मोनिका पटेल, रिषी कनोजिया, अनुशा बारेड्डी, स्नेह राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT