Rohit Sharma and Rinku Singh News Marathi sakal
क्रीडा

रिंकू सिंग इंग्लंडविरुद्ध खेळणार; BCCI ने भारतीय संघात केला समावेश, इशानची इथेही 'नो एंट्री'

India vs England Series 2024 News :

Kiran Mahanavar

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे कारण यावेळी दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारतात पोहोचणार आहे, तर टीम इंडियाही लवकरच सराव शिबिर सुरू करणार आहे. या सगळ्यामध्ये रिंकू सिंगही इंग्लिश संघाविरुद्ध खेळताना दिसणार असल्याची बातमी आली आहे. आणि बीसीसीआयनेही याची घोषणा केली आहे. भारत अ संघात रिंकूची ही एंट्री झाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरू होणार आहे. या मालिकेसोबतच भारत आणि इंग्लंड संघांमध्ये आणखी एक मालिका जी आधीच सुरू झाली आहे. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे, ज्यातील पहिला सामना 17 जानेवारी रोजी अहमदाबाद येथे सुरू झाला. या मालिकेतील आणखी 2 सामने खेळवले जाणार असून बीसीसीआयने यासाठी संघ जाहीर केला आहे.

बीसीसीआयच्या पुरुष वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी 19 जानेवारी रोजी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. या दोन्ही सामन्यांमध्येही संघाची कमान अभिमन्यू ईश्वरनकडेच राहणार असली तरी आणखी काही खेळाडूंनी मालिकेत संधी मिळाली आहे. यामध्ये रिंकू सिंग आहे.

टीम इंडियाच्या या उदयोन्मुख स्फोटक फलंदाजाची तिसऱ्या सामन्यासाठी संघात निवड करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर रिंकू सध्या उत्तर प्रदेश संघासोबत आहे, जिथे तो रणजी ट्रॉफी सामने खेळत आहे.

या संघात रिंकूशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांचाही समावेश करण्यात आला आहे. दोन्ही सामन्यांसाठी सुंदर आणि तिलक उपलब्ध असतील. या दोन्ही सामन्यांसाठी अर्शदीप सिंग आणि यश दयाल यांचीही निवड करण्यात आली आहे. याशिवाय यष्टीरक्षक कुमार कुशाग्र आणि उपेंद्र यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. कारण ध्रुव जुरेल आणि केएस भरत कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात सामील होणार आहेत. दुसरा सामना २४ जानेवारीपासून तर तिसरा सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादमध्येच खेळवला जाईल.

क्रिकेटमधून ब्रेकवर असलेला इशान किशन या मालिकेतही खेळणार नाही. इशान किशनने गेल्या महिन्यातच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मानसिक थकव्याचे कारण देत कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेतले होते. तेव्हापासून तो टीम इंडियातून बाहेर आहे.

प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी अफगाणिस्तान मालिकेपूर्वी सांगितले होते की, इशानने स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध करून दिले नाही. द्रविडने असेही सांगितले होते की, त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल, परंतु इशान सलग दोन रणजी सामन्यांसाठी खेळू शकला नाही. आता त्याची भारत अ मध्येही निवड झालेली नाही.

भारतीय अ संघ -

दुसरा सामना : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्रा, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कावेरप्पा, उपेंद्र यादव आणि यश दयाल.

तिसरा सामना : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, शम्स मुलानी, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दयाल आणि यश दयाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT