BCCI Announce Team India For ODI Series Against South Africa ESAKAL
क्रीडा

IND vs SA : ODI मालिकेसाठी संघ जाहीर; अय्यर उपकर्णधार तर संघात रजत पाटीदार

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Announce Team India For ODI Series Against South Africa : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. संघात रजत पाटीदार, शाहबाज अहमद, मुकेश कुमार, मोहम्मद सिराजचा देखील समावेश करण्यात आला. रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांना आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेनंतर तीन वनडे सामन्यांची मालिका देखील होणार आहे. ही मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होईल. पहिला सामना लखनौ येथे होईल. तर 9 ऑक्टोबरचा सामना रांची येथे खेळवला जाईल. 11 ऑक्टोबरला तिसरा आणि शेवटचा सामना दिल्लीत होणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय वनडे संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्डकपसाठी जाणाऱ्या भारतीय संघातील एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे मोहम्मद सिराजचा या संघात समावेश करण्यात आला आहे. जर बुमराह वर्ल्डकप खेळू शकला नाही तर मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता वनडे संघातील त्याच्या समावेशामुळे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भारतीय वनडे संघ

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT