क्रीडा

Ind vs Eng : टीम रोहितला मिळणार पगारावर लाखोंचा इनसेंटीव्ह! मालिका जिंकल्यानंतर BCCIची मोठी घोषणा

भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली.

Kiran Mahanavar

India vs England 5th Test : भारताने इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. भारताने या मालिकेतील पहिला कसोटी सामना गमावला पण त्यानंतर उर्वरित चार कसोटी सामने जिंकले. पाचव्या दिवसापर्यंत एकही कसोटी सामना झाला नाही. विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजासारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताने युवा खेळाडूंच्या जोरावर मालिका जिंकली.

मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव म्हणजेच BCCI जय शाह यांनी भारतीय कसोटी संघासाठी मोठी घोषणा केली. आता कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना मॅच फी व्यतिरिक्त पैसेही मिळणार असल्याचं बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटलं आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "भारतीय पुरुष कसोटी संघातील खेळाडूंसाठी 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' सुरू करताना मला आनंद होत आहे, जे आमच्या प्रतिष्ठित खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे. 2022-23 हंगामापासून सुरू होणारी 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' ही कसोटी सामन्यांसाठी दिल्या जाणाऱ्या 15 लाखांच्या मॅच फी व्यतिरिक्त असणार आहे.

अशी असेल कसोटीतील इनसेंटिव्ह स्किम

  • हंगामातील 50 टक्के पेक्षा कमी ( 4 कसोटी सामन्यापेक्षा कमी) कसोटी सामने खेळले तर त्या प्लेईंग 11 आणि संघाबाहेरील खेळाडूंना एकही रूपया इनसेंटिव्ह मिळणार नाही.

  • हंगामातील 50 टक्के पेक्षा जास्त कसोटी सामने (5 ते 6) खेळले तर प्लेईंग 11 मधील खेळाडूला 30 लाख रूपये प्रती सामना तर इतर खेळाडूंना 15 लाख रूपये प्रती सामना इनसेंटिव्ह मिळणार आहे.

  • हंगामातील 75 टक्केपेक्षा जास्त कसोटी सामने ( 7 पेक्षा जास्त) खेळलेल्या प्लेईंग 11 मधील खेळाडूला 45 लाख रूपये प्रती सामना तर इतर खेळाडूंना 22.5 लाख रूपये प्रती सामना इनसेंटिव्ह मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT