Rishabh Pant BCCI Injury  esakal
क्रीडा

Rishabh Pant : कसोटी मालिका महत्त्वाची; गुडघ्याची ताकद वाढवा; BCCI ने 'फिट' पंतला सोडले फर्मान!

अनिरुद्ध संकपाळ

Rishabh Pant BCCI Injury : श्रीलंकेविरूद्धच्या वनडे, टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होताच विकेटकिपर आणि डॅशिंग फलंदाज ऋषभ पंतबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. निवडसमितीने ऋषभ पंतला मर्यादित षटकांच्या कोणत्याही संघात स्थान दिले नाही. यानंतर ऋषभ पंतला डच्चू देण्यात आला आहे की तो दुखापतग्रस्त आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र बीसीसीआयच्याच एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत फिट आहे. मात्र तो मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी महत्वाचा खेळाडू असल्याने त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत आपले गुडघे मजबूत करण्यासाठी जाण्यास सांगितले आहे.

विकेटकिपिंग करताना सतत उठबस करावी लागत असल्याने गुडघ्यांवर ताण येतो. आधीच सततच्या दुखापतींमुळे हात पोळून घेतलेल्या बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून ऋषभ पंतला एनसीएमध्ये 3 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान आपल्या गुडघ्याची ताकद वाढवण्याचा सेशन करण्यास सांगितले आहे.

समोर आलेल्या या माहितीवरून असे लक्षात येते की ऋषभ पंतला कोणताही गंभीर दुखापत झालेली नाही. याचा अर्थ त्याला वनडे आणि टी 20 संघातून डच्चू दिला असून आता कसोटीवर लक्ष केंद्रीत कर असा इशाराच जणू बीसीसीआयने दिला आहे. (Sports Latest News)

दुसरीकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या दोघांसाठी एक विशेष सेशन आयोजित केले आहे. भारतीय संघात परतण्यापूर्वी हे दोन्ही खेळाडू मॅच स्टिम्युलेशनमधून जाणार आहे. एनसीएमधून मिळालेल्या माहितीनुसार बुमराह आणि जडेजा फिट झाले आहेत मात्र बीसीसीआय आता ताकही फुंकून पित आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT