T20 World Cup 2024 Rahul Dravid Marathi news sakal
क्रीडा

T20 World Cup : BCCI चे सचिव जय शाह यांच्याकडून शिक्कामोर्तब! टी-20 वर्ल्ड कपमध्ये 'हा' दिग्गज खेळाडू असणार संघाचा कोच

या वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे.....

Kiran Mahanavar

T20 World Cup 2024 Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्या खांद्यावरच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद असणार आहे. या वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेपर्यंत टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच कायम असणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याप्रसंगी दिली.

भारत-इंग्लंड यांच्यामध्ये राजकोट येथे तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटीच्या पूर्वसंध्येला येथील एका कार्यक्रमाला उपस्थित असताना जय शाह यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना आपली मते व्यक्त केली.

जय शाह पुढे म्हणाले, गेल्या वर्षी भारतातील एकदिवसीय विश्‍वकरंडक आटोपला. त्यानंतर भारतीय संघ नॉनस्टॉप क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिका दौरा, अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका असे सातत्याने क्रिकेटचे दौरे सुरू आहेत. मला राहुल द्रविड यांच्याशी सविस्तर बोलायचे आहे. लवकरच या विषयावर त्यांच्याशी बोलेन, पण टी-२० विश्‍वकरंडकापर्यंत त्यांच्याकडेच भारतीय संघाचे प्रशिक्षकपद असणार आहे.

जय शाह यांनी या वेळी करारबद्ध क्रिकेटपटूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावेच लागणार आहे, असेही स्पष्ट केले. याबाबत त्यांनी परखड मत व्यक्त करताना म्हटले की, निवड समिती प्रमुख, प्रशिक्षक किंवा कर्णधार यांनी तुम्हाला स्थानिक क्रिकेट खेळावयास सांगितले, तर तुम्हाला या सूचनांचे पालन करावेच लागणार आहे.

संघ मालकांना बीसीसीआयचे ऐकावे लागणार

बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंसाठी वर्कलोड व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. आयपीएलमध्येही याचे पालन करावे लागणार आहे. संघमालकांनाही बीसीसीआयच्या नियमांना मोडता येणार नाही. बीसीसीआय ही प्रमुख संस्था आहे. त्यामुळे संघ मालकांनाही ऐकावे लागणार आहे, असे जय शाह म्हणतात.

विराटबाबत नंतर बोलूया

जय शाह यांनी रोहित शर्मा याच्याकडे टी-२० विश्‍वकरंडकासाठी भारतीय संघाचे नेतृत्व असेल असे सांगितले असले तरी विराट कोहली टी-२० विश्‍वकरंडकात भारतीय संघामधून खेळणार की नाही याबाबत स्पष्ट केले नाही. ते म्हणाले, विराट कोहली याने मागील १५ वर्षांमध्ये वैयक्तिक कारणासाठी सुट्टी मागितली आहे. विनाकारण तो सुट्टी मागणार नाही. आमचा खेळाडूंवर विश्‍वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dalit CM : सिद्धरामय्यांचा उत्तराधिकारी कोण? कर्नाटकात दलित मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा पुन्हा तापली, 'या' चार नेत्यांची नावे अग्रभागी

Nashik Women's Cricket World Cup Winner: झुंजार बहिणींचा विजय! महिला विश्वकरंडक जिंकताच नाशिकमध्ये मध्यरात्री 'दिवाळी', तिरंगा फडकावत जल्लोष

PM Narendra Modi: तेजस्वी यांच्या नावाला सहमती नव्हती; मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

Latest Marathi News Live Update : महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष

आयोगाच्या बाजूने उत्तर देत नाही म्हणत भाजपनेही मतदारयादीतला घोळ पुराव्यासह दाखवला, 'सत्याचा मोर्चा'तलाच व्हिडीओ लावला

SCROLL FOR NEXT