BCCI Former President Sourav Ganguly Tweeted After BCCI Announce Equal Match Fee esakal
क्रीडा

Sourav Ganguly : BCCI च्या ऐतिहासिक घोषणेनंतर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया; वाचा कोणाला दिले श्रेय

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Former President Sourav Ganguly : बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटपटूंची कसोटी, वनडे आणि टी 20 ची मॅच फी ही पुरूष क्रिकेटपटूंइतकीच करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केला. या निर्णयाचे भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार स्वागत झाले. दरम्यान, बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने देखील याबाबत ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली.

सौरव गांगुलीने ट्विट केले की, 'आज सकाळी वर्तमानपत्रात पाहिलं... या सुंदर निर्णयासाठी जय, रॉजर, राजीवभाई, देबोजीत आणि सर्व अॅपेक्स काऊन्सिल सदस्यांचे अभिनंदन. महिला क्रिकेटपटू खूप मेहनत घेत आहेत. त्यांची ही मेहनत त्यांच्या कामगिरीतून दिसत आहे.'

बीसीसीआयने वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या पहिल्या सत्रात महिला आयपीएल आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता काही दिवसातच समान मानधनाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील महिला क्रिकेटचे एक नवे पर्व सुरू होणार याची चाहुल लागली आहे.

जय शहांनी हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करताना म्हणाले की, 'स्त्री पुरूष भेदभाव संपवण्यासाठी बीसीसीआय पहिले पाऊल टाकत असल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या महिला क्रिकेटपटूंसाठी समान मानधन धोरण राबवत आहोत. आता पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना मिळणारी मॅच फी ही समान असेल. क्रिकेटमधील स्त्री पुरूष समानतेचे नवे युग सुरू होत आहे.'

शहा पुढे म्हणाले की 'आता बीसीसीआयच्या महिला क्रिकेटपूटंना पुरूषांइतकीच मॅच फी मिळणार आहे. एका कसोटी सामन्यासाठी 15 लाख, वनडे सामन्यासाठी 6 लाख आणि टी 20 सामन्यासाठी 3 लाख रूपये मिळणार आहेत. महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याचे वचन मी दिले होते. हा निर्णय घेताना अॅपेक्स काऊन्सिलच्या सर्व सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार. जय हिंद'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT