BCCI give permission to the CAB bigger crowd attendance in 3rd T20I  esakal
क्रीडा

BCCI ने दिली खुशखबर! तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रेक्षकांची ग्रँड एन्ट्री

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तीन टी 20 (T20I Series) सामन्यांची मालिका कोलकात्याच्या इडन गार्डनवर (Eden Gardens) रंगणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) रविवारी होणाऱ्या तिसऱ्या टी 20 सामन्यात प्रेक्षकांना (Spectators) प्रवेश देण्याची परवानगी बंगाल क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.

क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (Cricket Association of Bengal) बीसीसीआयकडे इडन गार्डनच्या सगळ्या प्रेक्षक गॅलरींच्या अप्पर ब्लॉक स्टँडमध्ये चाहत्यांना प्रवेश देण्याची परवानगी मागितली होती. बीसीसीआयने क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालची ही विनंती बीसीसीआयने तिसऱ्या टी 20 (3rd T20I) सामन्यासाठी मान्य केली आहे.

बंगाल क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अविषेक दालमिया यांनी सांगितले की, बीसीसीआय अध्यक्ष सौरभ (Sourav Ganguly) गांगुलीने 'इतर पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर तुमची वेस्ट इंडीजविरूद्धच्या शेवटच्या टी 20 सामन्यात प्रेक्षकांसाठी इडन गार्डनची दारे उघडण्याची तुम्हाला परवानगी देत आहोत.' असा मेल केला आहे.

बुधवारी आणि शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या दोन टी 20 सामन्यासाठी काही प्रेक्षकांना मैदानातून सामना पाहण्यास परवानगी देण्यात आली आहे. वेस्ट इंडीजविरूद्धची अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील तीन सामन्यांची वनडे मालिका बंद दाराआड खेळवण्यात आली होती.

सध्या पश्चिम बंगालमध्ये कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार 15 फेब्रुवारीला राज्यात फक्त 133 नवे कोरोना रूग्ण आढळून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

IND vs AUS Semi Final : हे, बरोबर नाय...! Smriti Mandhana अम्पायरवर नाराज झाली, ऑस्ट्रेलियाची चतुराई की भारताचं दुर्भाग्य?

SCROLL FOR NEXT