Indian Cricket Team : जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पूर्ण तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेत तो खेळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेत खेळवले जाते का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीसीसीआयने जसप्रीत बुमरा, प्रसिद्ध कृष्णा, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या तंदुरुस्तीबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा हे स्नायू पुनर्बांधणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. आता ते पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजीही करत आहेत.
हे दोघेही गोलंदाज आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित सराव सामन्यात खेळतील. तेथे त्यांच्या मॅट फिटनेसचे अवलोकन करण्यात येईल आणि त्यानंतरच त्यांच्या पुनरागमनाचा निर्णय घेण्यात येईल, असे बीसीसीआयने कळवले आहे.
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी नेटमध्ये सराव सुरू केला आहे. त्यांच्या तंदुरुस्तीची क्षमता येत्या काळात वाढवण्यात येईल, तर कार अपघातात जखमी झालेल्या रिषभ पंतनेही तंदुरुस्ती मिळवण्यासाठी कमालीची प्रगती केली आहे. त्याने फलंदाजीसह नेटमध्ये यष्टिरक्षणाचाही सराव सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.