Hardik-Pandya Sakal
क्रीडा

तुझ्या मनाप्रमाणे नाही चालणार; BCCI नं पांड्याला दाखवली जागा

BCCI चा दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी 10 दिवसाचा फिटनेस कॅम्प

सकाळ वृत्तसेवा

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल 2022 मध्ये होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले आहे. या सामन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी जाहीर केलीये. बीसीसीआयच्या या यादीत इशान किशन,भुवनेश्वर कुमार,वेंकटेश अय्यर यांसह 25 खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना बंगळूरुस्थित NCA (National Cricket Academy) मध्ये दाखल होण्यास सांगितले आहे. या यादीमध्ये हार्दिक पांड्याचा समावेश नव्हता. पण आता त्यालाही या कॅम्पमध्ये दाखल होण्यास सांगण्यात आले आहे.

NCA चा बंगळुरमध्ये 10 दिवसांचा फिटनेस कॅम्प होणार आहे. NCA अध्यक्ष व्ही एस लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली हा कॅम्प असणार आहे. आयपीएल नंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी या खेळाडूंचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत निवड समितीने दिले आहेत. सांगितले आहे. यानंतर हार्दिकचा या यादीत समावेश केला गेला आणि त्याला मंगळवारी कॅम्प मध्ये दाखल होण्यास सांगितले होते.

हार्दिक पंड्याने या कॅम्पला जाण्यास नकार दिला होता. कॅम्पमध्ये सहभागी होण्याऐवजी अहमदाबाद येथे मेहनत घेईन, असे त्याने बीसीसीला सांगितले होते. मात्र निवड समितीने त्याच्यासंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर आता त्याला कॅम्पमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. दोन दिवसांत तो कॅम्पमध्ये दाखल होईल.

हार्दिक पांड्या NCA कॅम्पला येत नसल्याने निवड समितीने नाराजी व्यक्त केली होती. त्याने मुंबई आणि अहमदाबाद येथे सराव करण्याच्या निर्णयामुळे हार्दिकला निवड समितीने दम दिला आहे. यानंतर हार्दिकने आपला निर्णय बदलला आहे. हार्दिक पांड्या NCA च्या कॅम्पमध्येच सराव करणार आहे.आयपीएल झाल्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठीही त्याचा भारतीय संघात समावेश असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT