BCCI Media Rights esakal
क्रीडा

BCCI Media Rights : बीसीसीआयने अमॅझोन अन् गुगलशी साधला संपर्क, लिलावात होणार हाय व्होल्टेज ड्रामा?

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Media Rights : बीसीसीआयचे मीडिया हक्क लिलावातील रस हा आता निघून चालला आहे. लिलाव प्रक्रियेत देखील दिरंगाई होत आहे. अशा परिस्थितीत लिलावात रंजकता आणण्यासाठी बीसीसीआयने एक मोठं पाऊल उचलल्याचे वृत्त येत आहे. बीसीसीआयने अमॅझोन आणि गुगलचे मातृसंस्था अल्फाबेट यांच्याशी संपर्क साधत लिलावात उतरण्याची विनंती केल्याचे कळते आहे. (BCCI Media Rights Auction)

ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने अमॅझोन आणि गुगलला मीडिया हक्क लिलावात उडी घेण्याची विनंती केली आहे. सध्या बीसीसीआयच्या होम सिरीजसाठीचे मीडिया हक्क मिळवण्यासाठी फार कमी रस दाखवला जात आहे. त्यामुळे बीसीसीआयने आपली टेंडर प्रोसेस पुढे ढकलली आहे.

डिस्ने - स्टारने गेल्या लिलावात 103 सामन्यांसाठी 6138.10 कोटी रूपये मोजले होते. डिस्ने - स्टार एका सामन्यासाठी जवळपास 61कोटी रूपये बीसीसीआयला देत होता. बीसीसीआयने आता टीव्ही प्रक्षेपण आणि डिजीटल स्ट्रीमिंगसाठी वेगवेगळे हक्क विकले जाणार आहेत. यातून बीसीसीआयला 12000 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे.

मात्र वनडे सामन्यांची प्रसिद्धी कमी झाली आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर यासाठी मोठी रक्कम गुंतवण्यासाठी उत्सुक नाहीत. बीसीसीआयला आयपीएल मीडिया हक्क विक्रीतून 48,390 कोटी रूपये मिळाले आहेत. आयपीएल ही क्रिकेटचे सर्वात प्रसिद्ध प्रोडक्ट आहे. मात्र भारताच्या द्विपक्षीय मालिका अजून एवढा महसूल मिळवण्यात अपयशी ठरत आहेत.

बीसीसीआयने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने लिलावात गेल्या 6195 कोटींच्या महसुलात फार थोडी वाढ होईल असे सांगितले होते. प्रती सामन्यांचे मुल्य हे 61 कोटीच्या आसपासच राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआयला प्रती सामना 100 कोटींची अपेक्षा आहे. भारतीय संघ येत्या काळात जास्त टी 20 सामने खेळणार असला तरी लिलावात त्यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

स्टार स्पोर्ट्सने गेल्यावेळी बीसीसीआयचे मीडिया हक्क खरेदी केली होती. त्यांना जागतिक स्तरावर तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे ते आपल्या खर्चात कपात करत आहेत. त्यांना गेल्या बीसीसीआय मीडिया हक्क लिलावात जवळपास 1000 कोटींचा तोटा झाला होता. ते टीव्ही हक्कासाठी लिलावात सहभागी होतील मात्र ओटीटी हक्क लिलावापासून दूरच राहण्याची शक्यता आहे.

डिजीटल हक्कासाठी मुकेश अंबानींची व्हायकॉम 18 आक्रमकपणे लिलावात उतरण्याची शक्यता आहे. सोनी आणि झी देखील या लिलावात उतरतील. सोनीकडे इसीबी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे हक्क आहेत. फॅनकोड देखील लिलावात उडी घेण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cheating Case : मुंबईमध्ये पोलिस अधिकारी आहे, ‘महसूल’ खात्यातील नोकरी देतो; कोल्हापुरातील एकाची आयुष्याची कमाई लुटली अन्...

Vijay Hazare Trophy Schedule: रोहित शर्मा, विराट कोहली यांना Live खेळताना कुठे पाहता येणार? समोर आलं वेळापत्रक

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

Accident News : एक ट्रक उलटला, पाठीमागून ४ ट्रक, एक बस आणि कारने धडक दिली; दोघांचा मृत्यू, १६ जण जखमी

Thackeray Brothers Alliance : जागावाटप पूर्ण, कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा; राजकीय घडामोडींना वेग, महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT