Rohit Sharma T20 World Cup Captain esakal
क्रीडा

Rohit Sharma : BCCI करणार मनधरणी; रोहित दक्षिण अफ्रिका दौऱ्यासह टी 20 वर्ल्कपमध्ये देखील करणार टीम इंडियाचं नेतृत्व?

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma T20 World Cup Captain : भारताने वनडे वर्ल्डकपची फायनल हरल्यानंतर भारतीय क्रिकेट वर्तुळात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. भारत 10 डिसेंबरपासून दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने कोचिंग स्टाफचा विषय मार्गी लावला. राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफच्या संपलेल्या कराराला मुदतवाढ दिली.

मात्र आता बीसीसीआयला रोहित शर्माला दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर टी 20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करावे यासाठी मनधरणी करावी लागणार आहे. भारताचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या हा घोट्याच्या लिगामेंट इंज्युरीने त्रस्त आहे.

त्यामुळे तो दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे विराट कोहलीने आपण अनिश्चित काळासाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणार नसल्याचे कळवून टाकलं आहे.

दरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'हार्दिक पांड्या परतल्यानंतर काय हा प्रश्न उरतोच. मात्र बीसीसीआयला असं वाटतं की जर रोहित शर्मा टी 20 मध्ये देखील भारताचं नेतृत्व करण्याचं मान्य करतो तर तो टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारताचं नेतृत्व करेल. जर रोहित शर्माने नकार दिला तर सूर्यकुमार यादव दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील टी 20 मालिकेत भारताचं नेतृत्व करेल.'

बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी पुढे म्हणाले की, 'बीसीसीआय कायम सहा महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपला प्राधान्य देईल. वर्ल्डकपनंतर होणारे वनडे सामने ही तिसरी प्राथमिकता असेल. जर रोहित टी 20 मालिकेत नेतृत्व करण्याचं मान्य करतो तर त्याला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे तो कसोटी मालिकेसाठी फ्रेश राहू शकतो. हा निर्णय स्पोर्ट्स सायन्स टीम घेईल.'

अजित आगरकरच्या नेतृत्वाखाली निवडसमिती राहुल द्रविड आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत बसून भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील मालिकेसाठी संघ कसा असेल याची चर्चा करतील. सध्या हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत सूर्य कुमार यादव संघाचं नेतृत्व करत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT