BCCI ICC Revenue esakal
क्रीडा

BCCI ICC Revenue : 18,886 कोटी तेही वर्षाला! बीसीसीआयला मिळणार आयसीसीच्या निव्वळ उत्पन्नातील 40 टक्के वाटा

अनिरुद्ध संकपाळ

BCCI ICC Revenue : मिळालेल्या माहितीनुसार आयसीसीच्या 2024 ते 27 या उत्पन्नाच्या सायकलमध्ये बीसीसीआयची मोठी हिस्सेदारी असणार आहे. आयसीसीला या सायकलमध्ये जवळपास 600 मिलियन वार्षिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातील 38.5 टक्के हिस्सा हा बीसीसीआयला मिळणार आहे. यामुळे जागतिक क्रिकेटमधील भारताचे भक्कम स्थान अजूनच अधोरेखित झाले आहे.

बीसीसीआयला पुढील चार वर्षाच्या व्यासायिक सायकलमध्ये आयसीसीच्या सरप्लस निव्वळ उत्पन्नातील जवळपास 40 टक्के वाटा मिळणार आहे. आयसीसीच्या या नवीन उत्पन्नाबाबतच्या मॉडेलची माहिती इएसपीएल क्रिकइन्फोने दिली आहे.

कोणाला किती मिळणार?

या प्रस्तावित आयसीसी उत्पन्नाच्या मॉडेलनुसार बीसीसीआय ही सर्वाधिक कमाई करणारा बोर्ड ठरणार आहे. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाला 41.33 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 6.89 टक्के इतका वाटा मिळेल. तर आयसीसीच्या कामाईतील तिसरा सर्वात जास्त वाटा असलेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 37.53 मिलियन अमेरिकन डॉलर किंवा 6.25 टक्के वाटा मिळणार आहे.

याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 34.51 अमेरिकन डॉलर किंवा 5.75 टक्के वाटा मिळणार आहे. पाकिस्तान हे इतर 9 पूर्ण सदस्य क्रिकेट बोर्डापैकी एकमेव क्रिकेट संघटना आहे जिला 30 मिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त वाटा मिळणार आहे. इतर आठ पूर्णवेळ क्रिकेट बोर्डांना 5 टक्क्यापेक्षा कमी वाटा मिळणार आहे.

आयसीसीच्या एकूण निव्वळ उत्पन्नापैकी 88.81 टक्के वाटा हा 12 पूर्ण सदस्य असलेल्या क्रिकेट संघटनांना मिळणार आहे. तर असोसिएट सदस्यांना 11.19 टक्के वाटा मिळणार आहे. यातील वर्षाची एकूण रक्कम ही आयसीसीच्या कमाईवर अवलंबून आहे. ही जवळपास 3.2 बिलियन डॉलर अशू शकते. हे उत्पन्न फक्त माध्यम हक्काद्वारे मिळेल.

आयसीसीचा मीडिया राईट्समधील पैसा हा मुख्यत्वेकरून भारतीय बाजारातूनच येतो. यात डिसने स्टार चार वर्षासाठी 3 बिलियन अमेरिकन डॉलर देते. आयसीसीचे हे उत्पन्नाचे मॉडेल आयसीसीच्या टीमने तयार केले आहे. यात फायनान्स आणि कमर्शिअल अफेयर्स समितीचा देखील सहभाग होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT