BCCI doesn’t want day-night Test matches in India sakal
क्रीडा

Pink Ball Test : BCCI ने घेतला मोठा निर्णय; भारतात होणार नाही आता 'पिंक बॉल' टेस्ट, जाणून घ्या कारण?

Kiran Mahanavar

BCCI doesn’t want day-night Test matches in India : भारतात यापुढे पिंक बॉल टेस्ट सामने खेळवले जाणार नाहीत असे गृहीत धरावे का? कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कधीही पिंक बॉल टेस्टच्या बाजूने नव्हते. जगभर पिंक बॉलच्या प्रकाशाखाली कसोटी सामने खेळले जात असतानाही भारताने त्यात जास्त रस दाखवला नव्हता. यामुळेच टीम इंडियाने आतापर्यंत फक्त 4 डे नाईट टेस्ट सामने खेळले आहेत.

वृत्तानुसार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय बोर्ड आता पिंक बॉलच्या कसोटीसाठी उत्सुक नाही, कारण 4 किंवा 5 दिवस चालणारे सामने फक्त 2 ते 3 दिवसांत संपतात.

जय शाह पुढे म्हणाले की, पिंक बॉलची कसोटी लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी बीसीसीआयकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पण आत्तापर्यंत पिंक बॉलने खेळल्या जाणाऱ्या सर्व टेस्ट अवघ्या 2-3 दिवसात संपल्या आहे. तर लोकांना 4 ते 5 दिवस कसोटी सामने पाहायला आवडतात, ज्याची त्यांना सवय आहे. शाह म्हणाले की, पिंक बॉलची कसोटी ऑस्ट्रेलियात शेवटची खेळली गेली होती, त्यानंतर कोणत्याही देशाने त्याचे आयोजन केले नाही.

'पिंक बॉल' टेस्टमध्ये भारताचा रेकॉर्ड...!

टीम इंडियाने आत्तापर्यंत 4 पिंक बॉल टेस्ट खेळल्या आहेत, त्यापैकी 3 जिंकल्या आहेत तर एकात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध शेवटची पिंक बॉल टेस्ट खेळली होती, जी 3 दिवसात संपली.

भारतीय महिला क्रिकेट संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यांनी आत्तापर्यंत 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक पिंक बॉल टेस्ट खेळली होती. क्वीन्सलँडमध्ये खेळलेली ती कसोटी अनिर्णित राहिली होती.

बीसीसीआय सचिवांच्या या वक्तव्यानंतर असे वाटत आहे की, भारत आता पिंक बॉल टेस्ट खेळणार नाही. भारतीय पुरुष संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना 26 डिसेंबरपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही कसोटी लाल चेंडूने खेळल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात मनमानी खोदाईला ब्रेक! नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम मनपाने थांबवले; आधी रस्ते दुरुस्त करा, मगच पुढचे काम

Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग

Latest Marathi News Update LIVE : : सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट तापमान 9 अंश सेल्सिअस

Leopard Attack:'पती-पत्नीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला'; कोपरगाव तालुक्यातील दाेघे गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा थरार !

SCROLL FOR NEXT