Sourav Ganguly Corona Positive esakal
क्रीडा

सौरभ गांगुलीला कोरोनाची लागण; रुग्णालयात दाखल

अनिरुद्ध संकपाळ

बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीला कोरोनाची लागण (Sourav Ganguly Corona Positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेल्यानंतरही गांगुलीला कोरोनाची लागण झाली आहे. सौरभ गांगुलीला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत.

सध्या गांगुलीला कोलकात्यातील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या संकटात आता सौरभ गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी ही त्याच्या चाहत्यांसाठी चिंतेची आहे. याआधी रुग्णालयात असताना त्याच्यावर एकाच महिन्यात दोन वेळा Angioplasty करावी लागली होती. यातून बरं झाल्यानंतर गांगुली पुन्हा कामात व्यस्त झाला होता. (Sourav Ganguly Corona Positive)

सौरभ गांगुली एक वर्षभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल होत आहेत. याआधी जानेवारीमध्ये हार्ट अटॅकमुळे गांगुलीला रुग्णालयात जावं लागलं होतं. जानेवारी महिन्यात त्याला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या छातीत दुखत असल्याने तो रुग्णालयात गेला होता. गांगुलीला कोलकात्यातील घरात व्यायम करताना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर त्यावेळी अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.

20 दिवसांनी गांगुलीला पुन्हा चेस्ट पेनचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तो पुन्हा रुग्णालयात दाखल झाला आणि त्याच्यावर 28 जानेवारीला दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी झाली होती. यावेळी त्याच्या दोन धमण्यांमध्ये दोन स्टेंट बसवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT