MS Dhoni Coach Of Indian Men Cricket Team  esakal
क्रीडा

MS Dhoni Coach : जय शहा मोठ्या प्लॅनिंगमध्ये... राहुल द्रविडची सुट्टी, धोनीच्या गळ्यात पडणार प्रशिक्षकपदाची माळ?

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni Coach Of Indian Men Cricket Team : भारताचा दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. मात्र त्याच्या कार्यकाळात दोनवेळा भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकण्याची संधी होती.

मात्र संघाला यात अपयश आले. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभव केला. यानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही भारतीय चाहत्यांच्या मते राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून लवकरात लवकर हटवले पाहिजे. बीसीसीआय देखील याबाबत एका मोठ्या प्लॅनिंगमध्ये आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.

राहित - राहुलची होणार सुट्टी?

भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला एशिया कप 2022, टी 20 वर्ल्डकप 2022 आणि WTC Final 2023 यासारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये अपयश आले आहे. त्यामुळे राहुल द्रविडच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवेल असे वाटले होते. मात्र असं काही झालं नाही. त्यामुळे जय शहा लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या वर्षी भारतीय संघ मायदेशात वनडे वर्ल्डकप खेळणार आहे.

जर यामध्ये देखील भारतीय संघाला विजेतेपद जिंकण्यात अपयश आले तर रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची सुट्टी होऊ शकते.

धोनी मुख्य प्रशिक्षक?

महेंद्रसिंह धोनी भारताचा कर्णधार होता त्यावेळी भारतीय संघ दमदार कामगिरी करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी आयसीसी स्पर्धांमध्ये खालावत गेली आहे.

यामुळेच आता बीसीसीआय एमएस धोनीलाच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. धोनी हा 2021 च्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा मेंटॉर होता. आता धोनी हा संघाचा हेड कोच म्हणून संघाशी जोडला जाऊ शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT