bcci secretary jay shah confirms 2023 world cup schedule will undergo changes cricket sakal
क्रीडा

Cricket WC 2023 : वर्ल्डकपच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता - बीसीसीआय सचिव म्हणाले...

आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेल्या तीन मंडळांनी आयसीसीला पत्र लिहून त्यांच्या सामन्यांमध्ये बदल करावा, अशी मागणी केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी तीन मंडळांनी केली आहे, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिली. त्यामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेल्या तीन मंडळांनी आयसीसीला पत्र लिहून त्यांच्या सामन्यांमध्ये बदल करावा, अशी मागणी केली आहे. या सर्व मुद्द्यांवर पुढील तीन-चार दिवसांत मार्ग काढला जाईल, असे शहा यांनी सांगितले.

केवळ तारखा आणि वेळांमध्ये बदल केला जाईल. ठिकाणांमध्ये मात्र कोणताही बदल होणार नाही. ज्या संघांच्या दोन सामन्यांमध्ये सहा दिवसांची विश्रांती आहे, त्यांच्या दोन सामन्यांमधील अंतर ४-५ दिवसांपर्यंत कमी केले जाईल; परंतु जो बदल असेल तो तीन-चार दिवसांत होईल, असे शहा म्हणाले.

भारत-पाक सामना कधी?

अहमदाबादमध्ये १५ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेल्या भारत-पाक लढतीबाबत संभ्रम कायम आहे. घटस्थापनेमुळे ही लढत १४ तारखेला खेळवण्याबाबत बोलले जात आहे; परंतु त्यासाठी अगोदरच दोन सामने नियोजित आहेत. त्यामुळे आणखी तिसरा सामना शक्य नाही, असे सांगण्यात आले.

ज्या तीन मंडळांनी वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली, त्यात पाकचा समावेश आहे, असे समजते. शहा यांनी थेट नाव घेणे टाळले. भारत-पाक लढतीबाबत विचारले असता त्यांनी, काही मंडळाने वेळापत्रक बदलण्याची मागणी केल्याचा पुनरुच्चार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT