क्रीडा

मयांक इंग्लंडसाठी रवाना; रोहितसाठी बीसीसीआयचा 'बॅकअप प्लॅन'

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल इंग्लंडला रवाना झाला असून तो भारतीय कसोटी संघात सामील होणार आहे. रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने बीसीसीआयने मयांकला त्याचा बॅकअप म्हणून इंग्लंडला पाठवले आहे. भारत इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना 1 जुलै पासून सुरू होणार आहे. (BCCI Send Mayank Agarwal England As COVID 19 Positive Rohit Sharma Backup)

लिसेस्टरशायर विरूद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवशी रोहित शर्माने फलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. रोहित 1 जुलैपर्यंत फिट होण्याची शक्यता असली तरी बीसीसीआयने 31 वर्षाच्या मयांक अग्रवालला इंग्लंडला रवाना केले आहे. मयांकला इंग्लंडविरूद्धचा कसोटी संघ जाहीर झाला त्यावेळी संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र आधी केएल राहुलला झालेली गंभीर दुखापत आणि त्यानंतर रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मयांकची संघात वर्णी लागली.

बीसीसीआयने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार 'मयांक अग्रवाल आज इंग्लंडसाठी रवाना होत आहे. तो रोहितचा बॅकअप म्हणून संघात असेल. गरज लागली तर तो इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात देखील खेळेल. युकेमध्ये सध्या कोरोनाविषयक खबरदारीचे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मयांकची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली तर त्याला कोणत्याही विलगीकरणात रहावे लागणार नाही.'

इंग्लंडमधील एकमेव कसोटी सामना हा गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेतील स्थगित झालेला पाचवा सामना आहे. त्यावेळी भारतीय संघात कोरोनाच उद्रेक झाल्याने पाचवा कसोटी सामना स्थगित करण्यात आला होता. आता हा कसोटी सामना आणि त्याच्याबरोबर तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. गेल्या कसोटी मालिकेत भारताने 2 - 1 अशी आघाडी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT