IND vs AUS 3rd Test Venue
IND vs AUS 3rd Test Venue esakal
क्रीडा

IND vs AUS 3rd Test Venue : ऑस्ट्रेलिया आगीतून फुफाट्यात! BCCI ने तिसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलले

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 3rd Test Venue : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा धरमशाला येथून हवलण्यात येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून येत होते. अखेर यावर बीसीसीआयने आज शिक्कामोर्तब केले. यामुळे पहिल्याच कसोटीत फिरकी खेळपट्टीवर खेळताना कंबरडे मोडून घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला आता मालिकेतील एकमेवर आधार वाटणारी तिसरी कसोटी देखील जड जाणार आहे.

बीसीसीआयने तिसरा कसोटी सामना धरमशालावरून इंदौरला हलवला आहे. धरमशाला स्टेडियमच्या नुतनिकरण्याचे काम अजून अपूर्ण असल्याने हा निर्णय घेण्यात आला. हा कसोटी सामना पुण्यात खेळवण्यात येईल अशी चर्चा देखील होती मात्र इंदौरने बाजी मारली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर येथे खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना हा कांगारूंसाठी एक वाईट स्वप्न ठरला होता. कांगारूंचा भारताने एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. कांगारूंचा पहिला डाव 177 तर दुसरा डाव अवघ्या 91 धावात संपुष्टात आला. यावेळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भारतीय फिरकीपटूंपुढे भंबेरी उडाली होती.

पहिला कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसात संपुष्टात आला. भारताने एकाच डावात फलंदाजी करत 400 धावा ठोकल्या होत्या. या कसोटी मालिकेत कांगारूंची फिरकी खेळपट्ट्यांवर चांगलीच परीक्षा पाहिला जाणार आहे. या दरम्यान, त्यांना मालिकेतील तिसऱ्या कसोटीचा, धरमशाला कसोटीचा एकमेव आधार होता.

धरमशाला येथील वातावरण आणि खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना पोषक असते. या खेळपट्टीवर कांगारू भारताला चांगले आव्हान देऊ शकले असते. मालिकेतील दुसरी कसेटी ही दिल्लीत होत आहे. येथील खेळपट्टीही फिरकीचं नंदनवन असते. त्यामुळे तिसऱ्या कसोटीवर कांगारूंची डोळा होता.

मात्र बीसीसीआयने तिसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलून कांगारूंची चांगलीच गोची केली. बीसीसीआयने धरमशाला कसोटीचे ठिकाण बदलून ही कसोटी इंदौरला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधी नागपूर, त्यानंतर दिल्ली आणि आता इंदौर असे पहिले तीनही कसोटी सामने कांगारूंनी फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळावे लागणार आहेत.

चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी बीसीसीआयचा निर्णय म्हणजे आगीतून फुफाट्यात पडल्याचा प्रकार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT