BCCI Rohit Sharma Virat Kohli T20 Retirement  ESAKAL
क्रीडा

BCCI चा प्लॅन तयार! निवृत्ती जाहीर करणार नाही ठीक आहे, मात्र रोहित - विराटसारखे...

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Rohit Sharma Virat Kohli T20 Retirement : भारताचे दुसरा टी 20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न इंग्लंडने भारताचा सेमी फायनलमध्ये 10 विकेट्सनी पराभव करतात धुळीस मिळाले. यानंतर भारतीय संघाने नव्या दमाचा युवा संघ टी 20 क्रिकेटमध्ये खेळवायला हवा होता अशी चर्चा सुरू झाली. संघातील रोहित शर्मा, विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंनी आता टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी देखील मागणी झाली. आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीबाबत बीसीसीआयमध्ये काय सुरू आहे याबाबत माहिती दिली.

बीसीसीआय सूत्राच्या म्हणण्यानुसार आपल्याला 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताची ब्रँड न्यू टीम पहावयास मिळू शकते. याचबरोबर हार्दिक पांड्याकडे संघाचा दीर्घकालीन कर्णधार म्हणून देखील पाहिले जात आहे. बीसीसीआय सूत्र पीटीआयशी बोलताना म्हणाले की, 'बीसीसीआय कोणालाही कधीही निवृत्ती घेण्यास सांगित नाही. हा एक वैयक्तिक निर्णय असतो. मात्र हे सत्य आहे की 2023 मध्ये फार कमी टी 20 सामने होणार आहेत. अनेक वरिष्ठ खेळाडूंनी वनडे आणि कसोटीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.' ते पुढे म्हणाले, 'जर तुम्हाला निवृत्ती घोषित करायची नसेल तर तुम्ही तसं करू शकता. मात्र पुढच्या वर्षी तुम्हाला अनेक वरिष्ठ खेळाडू आता टी 20 संघात दिसणार नाहीत.'

भारतीय क्रिकेट संघाने आता लक्ष वनडे क्रिकेटकडे वळवले आहे. पुढच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. एफटीपी फ्युचर कॅलेंडरप्रमाणे भारतीय संघ पुढच्या वर्षी वर्ल्डकपूर्वी 25 वनडे सामने खेळणार आहे. तर 12 टी 20 सामने खेळणार आहे. यातील तीन टी 20 सामने आधीच न्यूझीलंडमध्ये पूर्ण झाले आहेत.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT