Asia Cup 2023 sakal
क्रीडा

Asia Cup Schedule : आशिया कपसाठी भारत करणार पाकिस्तानचा दौरा? IPL अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं की...

Kiran Mahanavar

Asia Cup Schedule : आशिया कप आणि विश्वचषकाबाबत पाकिस्तानचे नाट्य गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर निश्चित करण्यात आली असली, तरी पाकिस्तान त्यावर गदारोळ घालण्याचा प्रयत्न करत आहे.

तिकडे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी सांगितले होते की, या स्पर्धेसाठी टीम इंडिया इथे आली नाही तर पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी तटस्थ ठिकाणी सामन्याची मागणी करेल. यानंतर IPL चेअरमन अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काहीही झाले तरी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे धुमल यांनी म्हटले आहे.

बीसीसीआयचे अधिकारी आणि आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल सध्या आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी डर्बनमध्ये आहेत. अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले की बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि पीसीबीचे प्रमुख झका अश्रफ यांची आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले. आधी जे बोलले होते त्याच्याशी समत आहे. पाकिस्तानमध्ये साखळी टप्प्यातील चार सामने आणि त्यानंतर श्रीलंकेत नऊ सामने होतील. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याचा समावेश आहे. दोन्ही संघ अंतिम सामना खेळले तर तेही श्रीलंकेतच होईल.

अरुण धुमाळ यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याच्या पाकिस्तानी मीडियामध्ये येत असलेल्या अटकळांचे खंडन केले. पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांच्या हवाल्याने अशा बातम्या येत होत्या. धुमाळ म्हणाले, 'असे काही झाले नाही. भारतीय संघ किंवा आमचे सचिव पाकिस्तानात जाणार नाहीत. फक्त कार्यक्रम ठरला आहे.

भारतीय संघ श्रीलंकेतील डंबुला येथे पाकिस्तानशी खेळू शकतो. पाकिस्तानचा आपल्या भूमीवर एकमेव सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. याशिवाय पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामने होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT