BCCI vs PCB Anurag Thakur sakal
क्रीडा

BCCI vs PCB: पाकच्या धमकीला भीक घालण्याची गरज नाही, क्रीडामंत्र्यांचे प्रत्युत्तर

'वर्ल्ड कप' संदर्भात पाकिस्तान बोर्डाच्या टीकेला क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले.

Kiran Mahanavar

BCCI vs PCB Anurag Thakur : भारतामध्ये वर्ल्ड कप न खेळवण्याच्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या धमकीवर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक मोठा संघ खेळायला येणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी थेट सांगितले.

एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या पाकिस्तानच्या धमकीला प्रत्युत्तर देताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयचे उत्तर देईल आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक भारतातच होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक पाकिस्तानमधून हलवण्याबाबत केलेल्या टिप्पणीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. बीसीसीआयच्या बैठकीनंतर सचिव जय शाह यांनी आशिया चषक दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्याबाबत भाष्य केले होते.

पीसीबीच्या ब्लॅकमेल पत्राला बीसीसीआय उत्तर देईल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे. यासोबतच तो म्हणाला की, एकदिवसीय विश्वचषक नक्कीच भारतात होणार आहे. हा बीसीसीआयचा विषय आहे आणि बोर्ड त्याला उत्तर देईल. पुढील वर्षीही विश्वचषक होणार असून जगभरातील संघही खेळणार आहेत. भारताची अशी परिस्थिती आहे की त्याला कोणाचेही ऐकण्याची गरज नाही.

पाकिस्तान पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. योगायोगाने जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. पाकिस्तानमधील आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत जय शाह म्हणाले होते की, आशिया चषक 2023 तटस्थ ठिकाणी होणार आहे. आमच्या संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी द्यायची की नाही हे भारत सरकार ठरवते, त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही.

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्‍टोबरपासून टी-20 विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT