BCCI Will Adopt bone expert Software For Preventing Age Fraud
BCCI Will Adopt bone expert Software For Preventing Age Fraud esakal
क्रीडा

नवे सॉफ्टवेअर येणार! वय चोरी रोखण्यासाठी BCCI ने कंबर कसली

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट बोर्डाने आता वय चोरी रोखण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या बीसीसीआय वय चोरी (Age Fraud) रोखण्यासाठी बोन टेस्ट (TW3) पद्धती वापरते. आता बासीसीआय प्रायोगिक तत्वावर बोन टेस्टच्या जोडीलाच एक सॉफ्टवेअर देखील वापरणार आहे. यामुळे चाचणीचा निकाल त्वरित मिळणार आहे. तसेच बोन टेस्ट (Bone Test) करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात देखील 80 टक्क्यांपर्यंत बचत देखील होईल.

सध्याच्या घडीला बीसीसीआयला एका बोन टेस्टसाठी जवळपास 2400 रूपये खर्च येतो. या चाचणीचा निकाल हाती येण्यास तीन चार दिवस लागतात. आता बोनएक्सपर्ट सॉफ्टवेअर (Bone Expert Software) द्वारे या चाचणीचा निकाल त्वरित मिळणार आहे. या चाचणीचा खर्च फक्त 288 रूपये इतकाच येईल. दरम्यान, या सर्व प्रक्रियेबाबत बीसीसीआय म्हणते की, 'वयाची शास्त्रीय खात्री करण्यासाठी बीसीसीआय पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत खेळाडूंच्या मनगटाच्या हाडाचा एक्स - रे काढते. त्यानंतर राज्य क्रिकेट संघटना या एक्स - रेची कॉपी बीसीसीआयच्या AVP (वय सत्यता पडताळणी विभाग) कडे पाठवली जाते.'

बीसीसीआय पुढे म्हणते की, 'बीसीसीआय AVP या कॉपीची आपल्या स्वतंत्र रेडियोलॉजिस्टकडून पडताळणी करून घेते. या पडताळणीचा रिपोर्ट बीसीसीआयकडे पाठवण्यात येतो. या संपूर्ण प्रक्रियेला खूप वेळ लागतो. बीसीसीआयशी 38 राज्य संघटना सल्लग्नित आहेत. या सर्व संघटनांच्या खेळाडूंचे अहवाल तपासण्यासाठी बीसीसीआयकडे चार रेडिओलॉजिस्ट आहेत.' दरम्यान या प्रायोगिक तत्वावरील सॉफ्टवेअर वापरण्याबाबत बीसीसीआय राज्य संघटनांबरोबर एकत्र काम करणार आहे.

बीसीसीआयने आपल्या डेटाबँकमधील काही मर्यांदित एक्स - रेचे परिक्षण या सॉफ्टवेअरद्वारे तपासला असून त्याच्या निकालावर बीसीसीआय समाधानी आहे. मात्र तरी देखील बीसीसीआय मोठ्या संख्येने (जवळपास 3800) या सॉफ्टवेअरची चाचपणी करू इच्छिते.

जून 2019 मध्ये जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज रसिख आलमला खोटा जन्मदाखला देण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी 19 वर्षाखालील वर्ल्डकपमधील स्टार खेळाडू मंजोत कालरा, महाराष्ट्राचा अंकित बावणे यांना देखील आपले वय चोरल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT