भाविना पटेलने sakal
क्रीडा

जन्मानंतर पोलिओ आता ३४ व्या वर्षी रौप्य

राष्ट्रीय क्रीडादिनी भाविना पटेलने मिळवले पॅरालिंपिकमध्ये रुपेरी यश

सकाळ वृत्तसेवा

टोकियो : देशात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत असताना पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने (bhavina patel) इतिहास घडवला. पॅरालिंपिक (Paralympics) स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतले हे भारताचे पहिले पदक ठरले. महिला पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली.

एकापेक्षा एक शानदार विजय मिळवत भाविनाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु सुवर्णपदकाच्या लढतीत चिनी भिंत तिला भेदता आली नाही. १९ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात भाविनाचा चीनच्या झोऊकडून ७-११, ५-११, ६-११ असा पराभव झाला.

दुसरी पदकविजेतीभाविना पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणारी दुसरी महिला ठरली. याअगोदर दीपा मलिक यांनी गतस्पर्धेत गोळाफेकीत रौप्यपदक मिळवले होते. रिओ येथील स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला खेळाडू ठरलेल्या दीपा या सध्या भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अध्यक्ष आहेत.

झोऊकडून दुसरा पराभव

पॅरालिंपिक स्पर्धेतील टेबल टेनिस स्पर्धेत भाविनाच्या गटातील पहिल्या सामन्यातही झोऊकडून पराभव झाला होता. त्यानंतर मात्र भाविनाने प्रगतीचा आलेख उंचावला होता. आज पुन्हा तिला झोऊकडूनच हार स्वीकारावी लागली.

१२ महिने असतानाच पोलिओ

भाविना हिला ती १२ महिन्यांची असताना पोलिओ झाला होता, परंतु त्यांनी जीवनात कधीही स्वतःला कमी लेखले नाही. टेबल टेनिस खेळात कारकीर्द घडवत आता त्याला रुपेरी चमक दिली.

झोऊ अधिक अनुभवी

झोऊ भाविनापेक्षा किती तरी पटीने अधिक अनुभवी खेळाडू आहे. तिने बीजिंग आणि लंडन येथील एकेरीत सुवर्णपदकांसह पाच पॅरालिम्पिक पदके मिळवलेली आहेत. इतकेच नव्हे, तर सहा वेळा जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदकही जिंकलेले आहे. पहिल्या गेममध्ये झोउने ३-३ अशा बरोबरीनंतर ब्रेक मिळवला, परंतु भाविनानेही तिचा पाठलाग करत पिछाडी ५-७ अशी कमी केली होती, परंतु बेसलार्इनवरून खेळ करण्यात पटाईत असलेल्या झोऊने वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्येही झोऊ ७-१ असे आघाडीवर होती. भाविनाने हार मानली नव्हती. पिछाडी ४-७ अशी कमी केली, पण झोऊने हा गेमही जिंकत २-० आघाडी घेतली. तिसऱ्या गेममध्ये पुन्हा ५-५ बरोबरी होती, पण पुन्हा झोऊने आपले वर्चस्व मिळवले.

असा सुरू झाला टेबल टेनिसचा प्रवास

भाविनाने टेबल टेनिस हा खेळ खेळण्यास १३ वर्षांपूर्वी अहमदाबादच्या वस्त्रपूर परिसरातील ब्लाइंड पीपल्स असोसिएशनमध्ये हा खेळ खेळण्यास सुरुवात केली, जिथे येथे ती दिव्यांगांसाठी असलेल्या आयटीआयची विद्यार्थी होती. तेथे तिने दृष्टिहीन मुलांना टेबल टेनिस खेळताना पाहिले आणि त्यांनी हा खेळ घेण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादमधील रोटरी क्लबचे प्रतिनिधित्व करताना तिने स्पर्धेत पहिले पदक जिंकले, जिथे गुजरातसाठी ज्युनियर क्रिकेट खेळलेले निकुंज पटेल तिचे पती आहेत.

मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या प्रशिक्षकांनाही मी हे रौप्यपदक अर्पण करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी या टप्प्यावर पोहचू शकले. फिजिओ, आहारतज्ज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञांचे विशेष आभार.

- भाविना पटेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT