Big Bash League Sydney Sixers Coach Jay Lenton Enter In Stadium after Jordan Silk retired esakal
क्रीडा

Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाला रिटायर करत कोच उतरला मैदानात

अनिरुद्ध संकपाळ

सिडनी : बिग बॅश लीगच्या (Big Bash League) सेमी फायनलमध्ये एक अजब प्रकार घडला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) आणि अ‍ॅडलेड स्टाईकर (Adelaide Strikers) यांच्यात सेमी फायनल सामना सुरू होता. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने अ‍ॅडलेड स्ट्रायकरचा चार विकेट्सनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र गतविजेत्या सिडनी सिक्सर्सने सामना जिंकण्यासाठी एक अजब प्रकार केला. (Big Bash League Sydney Sixers Coach Jay Lenton Enter In Stadium after Jordan Silk retired)

सिडनी सिक्सर्सला विजयासाठी १ चेंडूत २ धावांची गरज होती. जॉर्डन सिल्क (Jordan Silk) फलंदाजी करत होता. मात्र सिडनी सिक्सर्सच्या प्रशिक्षकांनी जॉर्डन सिल्कला रिटायर करत आपले सहयोगी कोच जे लेंटन (Jay Lenton) यांना फलंदाजीला पाठवले. सिडनी सिक्सर्सने घेतलेल्या या निर्णयावर आता टीका होत आहे.

सेमी फायनल सामन्यापूर्वी सिडीन सिक्सर्सचा विकेट किपर दोश फिलिप (Josh Philippe) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे सिक्सर्सने आपल्या संघात ऐनवेळी सहयोगी कोच लेंटन यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला. क्रिकेटमध्ये सपोर्ट स्टाफ सदस्य प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक सपोर्ट स्टाफमधील सदस्य प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळले आहेत.

दरम्यान, सेमी फायनलमध्ये सिडनी सिक्सर्सची (Sydney Sixers) फिल्डिंग सुरू असताना जॉर्डन सिल्कच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे त्याला संघाने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याऐवजी संघ व्यवस्थापनाने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते. मात्र धावा घेण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे सिडनी सिक्सर्सच्या मुख्य प्रशिक्षकांनी सामन्याच्या शेवटच्या चेंडूआधी त्याला रिटायर केले आणि सहयोगी कोच जे लेंटनला फलंदाजीला पाठवले. ही रणनीती सिडनी सिक्सर्सच्या पथ्यावर पडली. त्यांनी शेवटच्या चेंडूवर सामना जिंकत फालनमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT