West Indies vs India 5th T20I  ESAKAL
क्रीडा

Brandon King WI vs IND : विंडीजचा 'किंग' साईज विजय; 17 वर्षात विंडीजमध्ये पराभव स्विकारणारा पांड्या पहिला कर्णधार

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 5th T20I : वेस्ट इंडीजने पाचव्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात भारताचा 8 विकेट्सनी पराभव करत मालिका 3 - 2 अशी जिंकली. भारताने ठेवलेले 166 धावांचे आव्हान विंडीजने षटकात पार केले. वनडे वर्ल्डकपची क्वालिफायर स्टेजही पार न करून शकलेल्या वेस्ट इंडीजने टी 20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या भारताला पराभवाची धूळ चारली.

विंडीजकडून सलामीवीर ब्रँडन किंगने (Brandon King) आक्रमक फलंदाजी करत नाबाद 85 धावा केल्या. त्याने निकोलस पूरन (Nicholas Pooran) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली. पूरनने 47 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. (Hardik Pandya Captaincy)

वेस्ट इंडीजने भारताविरूद्ध किमान 3 सामन्यांची मालिका तब्बल 17 वर्षांनी जिंकली आहे. याचाच अर्थ की 17 वर्षानंतर वेस्ट इंडीजकडून मालिका गमावणारा हार्दिक पांड्या हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे भारताने 2006 मध्ये पहिल्यांदा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर पहिल्यांदाच भारताने टी 20 मालिकेत तीन सामने गमावले आहेत.

भारताने ठेवलेल्या 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 12 धावांवर पहिला धक्का बसला. अर्शदीप सिंगने कायल मेयर्सची शिकार केली. मात्र यानंतर विंडीजच्या निकोसल पूरन आणि ब्रँडन किंग यांनी भारताच्या सर्व गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.

पावसामुळे आऊटफिल्ड ओली झाली होती. त्यामुळे चेंडू ग्रिप करण्यासाठी अडचण येत होती. याचा फायदा निकोलस पूरन आणि किंगने उचलला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी केली. ब्रँडन किंगने अर्धशतक ठोकले. तर पूरनने 47 धावा केल्या.

अखेर ही जोडी युवा तिलक वर्माने फोडली. त्याने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर पूरनला बाद केले. मात्र त्यानंतर किंगने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 17 व्या षटकात विंडीजला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

अखेर ब्रँडन किंगने 55 चेंडूत नाबाद 85 धावा करत वेस्ट इंडीजला 18 व्या षटकात विजय मिळवून दिला.

भारताने वेस्ट इंडीजविरूद्धच्या पाचव्या आणि निर्णयाक सामन्यात नाणेफेक जिंकून 20 षटकात 9 बाद 165 धावा केल्या. भारताकडून उपकर्णधार सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत 61 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT