Brazilian coach Tite facing problem  
क्रीडा

ब्राझीलचे प्रशिक्षक टिटेंवर आता टांगती तलवार 

वृत्तसंस्था

सोची- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर गेलेल्या ब्राझीलचे प्रशिक्षक टिटे यांच्यासमोर भवितव्याच्या प्रश्‍न उभा राहिला आहे. प्रशिक्षकपदावर राहावे की दूर जावे, असा विचार त्यांच्या मनात घोळत असला तरी, ब्राझील फुटबॉल संघटना कोणता निर्णय घेते, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. 

ब्राझीलला संभाव्य विजेतेपदासाठी पसंती दिली जात होती. बाद फेरीपर्यंत त्यांची अपेक्षित वाटचाल सुरू होती; पण बेल्जियमविरुद्ध स्वयंगोलाचा फटका त्यांना बसला आणि 1-2 अशी हार त्यांना सहन करावी लागली. या स्पर्धेत सर्वांत संयमी आणि हुशार प्रशिक्षक म्हणून टिटे यांना पसंती दिली जात होती. बहुतेक प्रशिक्षक अतिउत्साहीपणा दाखवत असताना टिटे मात्र हास्यमुद्रा दाखवतानाही सावधगिरी बाळगत होते. 

ब्राझीलचा पवित्रा नेहमीच आक्रमक राहिलेला आहे. टिटे यांनी हा वसा कायम ठेवत आक्रमक आणि सकारात्मक भूमिका कायम ठेवली. ही जमेची बाजू त्यांच्यावरील विश्‍वास कायम ठेवण्यास मदत करणारी ठरू शकेल. टिटे या पदावर कायम राहिले तर कतारमधील 2022 च्या स्पर्धेसाठी संघ उभारणी करताना त्यांना सोपे जाईल. कारण, सध्याच्या ब्राझील संघातील खेळाडू तरुण आणि नवोदित असल्यामुळे बहुतांशी खेळाडू कायम राहू शकतील. नेमार, फिलिप कुटिन्हो, रोब्रेटो फिर्मिनो आणि कॅसेमिरो हे आत्ता 26 वर्षांचे आहेत; तर डग्लस कॉस्टा हा एका वर्षाने मोठा आहे. गॅब्रियल जिजस 21, तर मारकिन्हो 24 अशा वयोगटातील खेळाडू आहेत, पुढच्या विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत ते कायम राहतील, अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP AIMIM Row: ओवैसींसोबत युतीचा फटका! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा महाराष्ट्रात ‘थेट इशारा’, पडद्यामागे काय घडलं?

Gold Price Fall : सोन्या-चांदीचे भाव घसरले, गुंतवणूकदारांना दिलासा; शेअर बाजाराचा आलेखही घसरला

Devendra Fadnavis: गरिबांचे पैसे खाल्‍लेल्‍यांना जेलची हवा खायला लावणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘सिस्पे’ गैरव्यवहाराची ‘सीबीआय’ चौकशी करू!

Accident News: कन्नड घाटातील भीषण अपघातात शेवगावच्या तिघांचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी, देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला!

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

SCROLL FOR NEXT