saurav ganguly 
क्रीडा

ब्रिटनच्या संसदेकडून BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींचा गौरव

ब्रिटिश संसदेकडून गौरव करण्यात आल्यानं गांगुली यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लंडन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासाठी बुधवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. त्याचं कारण म्हणजे ब्रिटिश संसदेकडून त्यांचा टीम इंडियाचे माजी कर्णधार म्हणून गौरव करण्यात आला. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (British Parliament felicitates BCCI President Sourav Ganguly)

सौरव गांगुली म्हणाले, ब्रिटिश पार्लमेंटनं टीम इंडियाचा माजी कर्णधार म्हणून माझा गौरव केला, एक बंगाली नागरिक म्हणून मला याचा आनंद आहे. पार्लमेंटच्या कार्यालयानं यासाठी माझ्याशी सहा महिन्यांपूर्वीच संपर्क साधला होता. ते प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देतात आणि यंदा तो मला मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे १३ जुलै २००२ रोजी बरोबर २० वर्षांपू्र्वी भारत नॅटवेस्ट फायनलवेली गांगुलींचा गौरव करण्यात आला होता.

दरम्यान, ८ जुलै रोजी सौरव गांगुली यांनी ५० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांनी लंडन आय जवळ केलं होतं याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मी लंडनमध्ये राहतो, माझी मुलगी इथेच शिकत आहे. तिच्यासोबत इथं वेळ घालवणं छान वाटतं, असंही सौरव गांगुली यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: RBI सरकारला देणार तब्बल 2.87 लाख कोटी! कारण काय? बँकिंग,शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

IPL 2026 Playoff Scenarios: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध Eliminator सामना कोण खेळणार? एका जागेसाठी ४ संघात टक्कर; पाहा समीकरण

Pune Metro Leak : पुणे मेट्रोत गळती! कोट्यवधींच्या प्रकल्पाच्या सुरक्षेवर मोठा सवाल; VIDEO पाहून पुणेकर हादरले

Marathi Live News update: अमरावती जिल्ह्यात 24 वर्षीय युवकाचा 11 केव्ही लाईन चा शॉक लागून मृत्यू

Cockroach Janta Party चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक! तुमचं इन्स्टाग्राम हॅक होऊ नये यासाठी आजच बदला 'या' 3 सेटिंग

SCROLL FOR NEXT