PV Sindhu ANI
क्रीडा

सिंधूचा थाट; 24 मिनिटांत प्रतिस्पर्ध्याचा खेळ खल्लास!

दुसऱ्या बाजूला लक्ष्य सेन याला पहिल्या विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.

सुशांत जाधव

BWF World Championship : दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मंगळवारी झालेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील लढतीत सिंधूनं स्लोवाकियाच्या मार्टिना रेपिस्काला 21-7, 21-9 असे एकतर्फी पराभूत करुन पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. दुसऱ्या बाजूला पुरुष गटात नवोदित लक्ष्य सेन याने जपानच्या 15 व्या मानांकित केंटा नाशिमोटो याला 22-20, 15-21, 21-18 असे पराभूत करत सर्वांचे लक्ष वेधलं.

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडगोळीनं चीनी ताइपेच्या के ली झी हुएइ आणि यांग पो सुआनयांना 43 मिनिटांच्या लढतीत 27-25, 21-15 असे पराभूत केले. जागतिक क्रमावारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं बिगर मानांकित प्रतिस्पर्धीचा खेळ अवघ्या 24 मिनिटात खल्लास केला. 2019 मध्ये सिंधून ही स्पर्धा गाजवली असून वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा स्पर्धेत छाप सोडण्यासाठी सिंधू उत्सुक असेल.

रेपिस्का विरुद्धच्या सामन्यात सिंधूनं पहिला सेट 10 मिनिटाला आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने तीच झलक दाखवून दिली. या सेटमध्ये अवघ्या 2 मिनिटांत सिंधूनं 6-0 अशी आघाडी मिळवली. ब्रेकपर्यंत तिने 11-1 अशी मजबूत आघाडी घेतली होती.

दुसऱ्या बाजूला लक्ष्य सेन याला पहिल्या विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. त्याची लढत एक तास 22 मिनटे रंगली होती. अखेर त्याने जपानच्या प्रतिस्पर्ध्याला नमवत स्पर्धेत आगेकूच केली. मिश्र दुहेरीत सौरभ शर्मा आणि अनुष्का पारिख या भारतीय जोडीला मलेशियाच्या कियान मेंग आणि लाइ पेइ जिंग जोडीनं 21-8, 21-18 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

E-Scooter : 107 रुपयांत पूर्ण महिना चालेल 'ही' स्कूटर; एप्रिल महिन्यात 17,960 लोकांनी केली खरेदी, एकदा बघाच कमी किंमतीत जबरदस्त गाडी

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SCROLL FOR NEXT