BWF World Championship Kidambi Srikanth Sakal
क्रीडा

BWF World Championship : सुवर्ण हुकलं; तरीही श्रीकांतनं इतिहास रचला

सुशांत जाधव

BWF Badminton Championships Final : भारतीय पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक फायनल खेळणाऱ्या किदाम्बी श्रीकांतचे (Kidambi Srikanth) सुवर्ण स्वप्न भंगले. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम लढतीत सिंगापुरच्या लोह कीन येव ((Loh Kean Yew)) याने 21-15, 22-20 अशा फरकाने श्रीकांतला पराभूत केले. या पराभवामुळे श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष गटात भारताकडून पहिले सुवर्ण पटकावण्याची त्याला संधी होती. पण फायनलमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत होऊनही रौप्य पदकासह त्याने इतिहास रचला आहे.

किदाम्बी श्रीकांत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत (BWF World Championships 2021 ) रौप्य पदकाची कमाई करणारा पहिला पुरुष खेळाडू आहे. 1983 मध्ये प्रकाश पादुकोण यांनी कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर 2019 बी साई प्रणीतने आणि याच हंगामात लक्ष्य सेन ने कांस्य पदक पटकावले होते.

किदाम्बी श्रीकांतने फायनलमध्ये दमदार सुरुवात केली होती. पहिल्या सेटमध्ये त्याने ब्रेक टाइमपर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली होती. यादरम्यान त्याने आपल्या अप्रतिम डाउन द कोर्ट स्मॅशनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. मात्र ब्रेकनंतर त्याची लय बिघडली. काही शुल्लक चुकांची किंमत त्याला पहिला सेट गमावून चुकवावी लागली. पिछाडी भरून काढत लोह कीन येव याने पहिला सेट 21-15 असा आपल्या नावे केला.

दुसऱ्या सेटमध्येही श्रीकांतने प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात आक्रमक खेळ दाखवला. त्याने या सेटमध्येही 7-5 अशी आघाडी घेतली होती. मात्र जे पहिल्या सेटमध्ये झाले तेच दुसऱ्या सेटमध्येही घडलं. ब्रेक टाइमपर्यंत लोह कीन येव यानं 11-9 अशी आघाडी घेतली. त्यानंतर श्रीकांतने 18-16 अशी आघाडी घेतली. या सेटमध्ये दोघांच्यात चांगलाच संघर्ष झाला. टायब्रेक पर्यंत पोहचलेल्या लढतीत अखेर सिंगापूरच्या शटरलने बाजी मारली.

28 वर्षीय श्रीकांतने सेमीफायनलमध्ये भारताच्या युवा लक्ष्य सेन याला 69 मिनिटे चाललेल्या लढतीत 17-21, 21-14, 21-17 असे पराभूत करुन फायनल गाठली होती. महिला गटातून पीव्ही सिंधूचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यानंतर लक्ष्य आणि श्रीकांतने भारताला पदक मिळवून देणारी कामगिरी केली. श्रीकांतला रौप्य तर लक्ष्य सेन याला कांस्य पदक मिळाले. पुरुष गटातील या दोघांची कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT