Vidit Santosh Gujrathi | Chess  X/FIDE_chess
क्रीडा

Candidates Chess: विदितचा नाकामुरावर रोमहर्षक विजय; गुकेश-प्रज्ञानंद लढत ड्रॉ

Candidates Chess Tournament: कँडिडेट चेस स्पर्धेत रविवार रात्रीपर्यंत या स्पर्धेच्या नऊ फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पाच फेऱ्या अद्याप बाकी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Candidates Chess Tournament: भारताचा अनुभवी ग्रँडमास्टर विदित गुजराथी याने रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत अमेरिकेचा स्टार खेळाडू हिकारु नाकामुरा याच्यावर रोमहर्षक विजय संपादन केला. विदितने नऊ फेऱ्यांनंतर ४.५ गुणांची कमाई करताना अजिंक्यपदाच्या शर्यतीत आपण कायम असल्याचे दाखवून दिले.

डी. गुकेश-आर. प्रज्ञानंद या भारतीय युवा खेळाडूंमधील लढत ड्रॉ राहिली. आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश व इयान नेपोनियात्ची हे दोघेही ५.५ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर कायम आहेत.

आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत (Candidates Chess Tournament) एकूण १४ फेऱ्यांमध्ये खेळाडूंचा कस लागतो. रविवार रात्रीपर्यंत या स्पर्धेच्या नऊ फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पाच फेऱ्या अद्याप बाकी आहेत.

आता उर्वरित फेऱ्यांदरम्यान दोन दिवसांची विश्रांतीही खेळाडूंना मिळणार आहे. सध्या गुकेश व नेपोनियत्ची हे खेळाडू संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. भारताचा आर. प्रज्ञानंद यानेही पाच गुणांची कमाई करीत क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला.

विदित गुजराथी याला शनिवारी झालेल्या लढतीमध्ये डी. गुकेशकडून हार पत्करावी लागली होती, पण या पराभवाला मागे टाकून विदित याने नवव्या फेरीत झोकात पुनरागमन केले. विदितच्या आक्रमक चालींसमोर हिकारू नाकामुरा याचा निभाव लागला नाही. अखेर त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.

स्टार खेळाडूंमधील चुरस

आर. प्रज्ञानंद-डी. गुकेश या भारताच्या दोन स्टार बुद्धिबळपटूंमध्ये नवव्या फेरीची चुरस रंगली. दोघांनी एकापेक्षा एक चाली रचल्या, पण कुणालाही विजय मिळवता आला नाही. अखेर ४१ चालींनंतर ही लढत ड्रॉ राहिली.

चीनची टॅन आघाडीवर

महिला विभागात चीनची खेळाडू टॅन झोंगयी हिने सहा गुणांसह पुन्हा आघाडी मिळवली आहे. टॅन हिने भारताच्या आर. वैशालीवर विजय मिळवताना पहिले स्थान पटकावले. लेई टिंग जी व ॲलेक्झँड्रा जी. या दोघींनी पाच गुणांची कमाई केली आहे. भारताची कोनेरु हम्पी चार गुणांसह सहाव्या स्थानावर असून आर. वैशाली २.५ गुणांसह तळाच्या स्थानावर आहे.

नऊ फेऱ्यांनंतर पुरुष विभागाची क्रमवारी

१) डी. गुकेश (५.५ गुण), २) इयान नेपोनियात्ची (५.५ गुण), ३) आर. प्रज्ञानंद (५ गुण), ४) हिकारु नाकामुरा (४.५ गुण), ५) विदित गुजराथी (४.५ गुण), ६) फॅबियानो कॅरुअना (४.५ गुण), ७) एलिरेझा फिरॉझा (३.५ गुण), ८) निजात एबासोव (३ गुण). (टीप - गुकेश व नेपोनियत्ची गुणांनुसार संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra E-Bond: कागदी बाँडला रामराम; ई-बाँडची सुरुवात, महायुती सरकारचा मोठा निर्णय, फायदे काय?

Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Vande Bharat Train Accident : दसरा उत्सवावरुन परतणाऱ्या पाच तरुणांना 'वंदे भारत' ची धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Latest Marathi News Live Update: अभिनेते सयाजी शिंदे ‘सखाराम बाईंडर’ नाटकात पुन्हा दिसणार

SCROLL FOR NEXT