Captain Rohit Sharma Have Chance to Equals Babar Azam T20 Record  esakal
क्रीडा

IND vs SL: हिटमॅनची खेळी उतरवणार का बाबरची मिजाशी?

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : भारताचा टी 20 कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश दिल्यानंतर आता तो श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी (India vs Sri Lanka) सज्ज झाला आहे. मालिकेतला पहिला सामना 24 फेब्रुवारीला लखनौ येथे होणार आहे. हा सामना रोहितसाठी एक खास रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) पहिल्या क्रमांकावर आता रोहित शर्माही दावेदारी सांगणार आहे. (Captain Rohit Sharma Have Chance to Equals Babar Azam T20 Record)

रोहित शर्माला कॅप्टन (Captain Rohit Sharma) म्हणून टी 20 मध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 63 धावांची गरज आहे. जर त्याने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 63 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून आपल्या 1000 टी 20 धावा पूर्ण करेलच, मात्र तो बाबर आझमच्या विक्रमाशी (Babar Azam T20 Captaincy Record) देखील बरोबरी करेल. बाबर आझमने कर्णधार म्हणून 26 डावात 1000 टी 20 धावा पूर्ण केल्या आहे. तो सर्वात वेगवान टी 20 1000 धावा पूर्ण करणारा कर्णधार ठरला आहे.

दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 25 डावात 927 धावा केल्या आहेत. त्यामुळे श्रीलंकेविरूद्धच्या लखनौमधील पहिल्या टी 20 सामन्यात जर रोहित शर्माने 63 धावांची खेळी केली तर तो बाबर आझमची बरोबरी करेल. या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने कर्णधार असताना 30 डावात 1000 टी 20 धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फाफ ड्युप्लेसिस आहे. त्याने 31 डावात 1000 टी 20 धावा पूर्ण केल्या होत्या.

दरम्यान, पहिल्या टी 20 सामन्यात रोहित शर्माला फक्त बाबर आझमची बरोबरी करण्याची संधी नाही तर मार्टिन गप्टीलचे (Martin Guptill) सर्वाधिक टी 20 आंतरराष्ट्रीय धावांचे रेकॉर्ड देखील तोडण्याची संधी आहे. रोहितने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात जर 37 धावा केल्या तर तो सर्वाधिक 3299 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचे गप्टिलचे रेकॉर्ड मोडू शकेल. रोहितच्या आता 3263 धावा झाल्या आहेत. या यादीत विराट कोहली 3296 धावा करून दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रोहितला या दोघांनी मागे टाकण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT