French Open Carlos Alcaraz  esakal
क्रीडा

French Open 2024 : कार्लोस अलकराझने गाठली फ्रेंच ओपनची फायनल; नदालचा मोठा विक्रम मोडण्याची संधी

अनिरुद्ध संकपाळ

French Open Carlos Alcaraz : कार्लोस अलकराझने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जेनिक सिनेरचा पराभव रत फ्रेंच ऑपनची फायनल गाठली. कार्लोसने जेनिकचा 2-6, 6-3, 3-6, 6-4, 6-3 असा पाच सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात पराभव केला.

स्पेनचा 21 वर्षाचा कार्लोस आता अलेक्झांडर झ्वेरेव किंवा कॅस्पर रूड या दोघांपैकी एकासोबत अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामना हा रविवारी होणार आहे. फ्रेंच ओपनची फायनल गाठणारा कार्लोस हा ग्रँड स्लॅमच्या तीनही सर्फेसवर अंतिम फेरी गाठणारा सर्वात कमी वयाचा टेनिसपटू ठरला आहे.

स्पेनच्या या टेनिसपटूने गेल्या वर्षी विम्बल्डनची फायनल आणि 2022 मध्ये युएस ओपनची फायनल गाठली होती.

तीनही ग्रँडस्लॅम सर्फेसवर फायनल खेळणारे सर्वात तरूण टेनिसपटू

  • कार्लोस अलकराझ - 21 वर्षे 1 महिना

  • आंद्रे आगासी - 22 वर्षे 1 महिना

  • बजॉर्न बोर्ग - 22 वर्षे 2 महिने

  • राफेल नदाल - 22 वर्षे 6 महिने

  • जिम कुरियर - 22 वर्षे 10 महिने

जर कार्लोसने रविवारी होणारी फ्रेंच ओपनची फायनल जिंकली तर कार्लोस हा तीन ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात तरूण टेनिसपटू ठरणार आहे. यापूर्वी हे रेकॉर्ड स्पेनच्याच राफेल नदालच्या नावावर आहे. त्याने 2010 मध्ये असा कारनामा केला होता. त्याने 24 वर्षे 1 महिना वय असताना विम्बल्डन जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

Pune News : चेहरा दाखवला तरच मिळणार पगार; झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम, महापालिकेने विकसित केले ॲप

Nagpur Goa Shaktipeeth Highway : भाविकांच्या भावनांशी खेळ? शक्तिपीठ महामार्गावरून माहूर तीर्थक्षेत्र थेट 17 किलोमीटर लांब ढकलले; नव्या नकाशात कोणता केला बदल?

SCROLL FOR NEXT