Wimbledon 2024 Sakal
क्रीडा

Wimbledon 2024 : मेदवेदेव, अल्काराझची विजयी सलामी; विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये मानांकित खेळाडूंची वाटचाल

स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याने सोमवारी झालेल्या लढतीत मार्क लजाल याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय साकारला.

सकाळ वृत्तसेवा

लंडन : विम्बल्डन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅमच्या पहिल्याच दिवशी मानांकित खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करीत विजयी वाटचाल केली. तिसरा मानांकित कार्लोस अल्काराझ व पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी अनुक्रमे मार्क लजाल व ॲलेक्झँडर कोवासेविच यांना नमवत विजयी सलामी दिली.

स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याने सोमवारी झालेल्या लढतीत मार्क लजाल याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय साकारला. मात्र, पहिल्या दोन सेटमध्ये मार्ककडून कार्लोसला कडवी झुंज मिळाली. कार्लोस याने दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि पहिले दोन सेट ७-६, ७-५ असे जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये मात्र कार्लोसच्या झंझावातापुढे मार्कचा निभाव लागला नाही. कार्लोस याने हा सेट ६-२ असा जिंकत सामनाही आपल्या नावावर केला. कार्लोस याने दोन तास २३ मिनिटांमध्ये ही लढत जिंकली.

सहज विजय

डॅनिल मेदवेदेव याने ॲलेक्झँडर कोवासेविच याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय नोंदवला. मेदवेदेव याने कोवासेविचविरुद्धचा पहिला सेट ६-३ असा आपल्या नावावर केला. पुढील सेटमध्ये मेदवेदेव याने ६-४ असे यश मिळवले. तिसरा सेट ६-२ असा जिंकत मेदवेदेव याने आगेकूच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT