Vinod Kambli 
क्रीडा

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा अडचणीत ; पत्नीला तवा फेकून मारला, गुन्हा दाखल!

सकाळ डिजिटल टीम

Vinod Kambli : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यानी आपल्याला मारहाण केली, असा आरोप त्याची पत्नी अँड्रियाने केला आहे. या प्रकरणी विनोद कांबळीवर वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. 

विनोद कांबळी यांनी तव्याचे हँडल फेकून मारले त्यामुळे इजा झाल्याचे कांबळीच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार विनोद दारु पिऊन घरी आला होता. घरात येताच त्याला पत्नीने हटकले. त्यामुळे त्याला राग आला. मग स्वयंपाक घरात जाऊन त्याने तव्याचे हँडल आणले आणि मला फेकून मारले, असा आरोप पत्नीने केला आहे. या प्रकरणी विनोदला अद्याप अटक झालेली नाही. 

यापूर्वी देखील विनोद कांबळीला पोलिसांनी अटक केली होती. क्रिकेटपटू विनोद कांबळी याला दारूच्या नशेत कार चालवताना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या कृत्यानंतर त्याने दारु पिऊन गेटवरील चौकीदार आणि त्या सोसायटीत राहणाऱ्या काही लोकांशी वाद घातला होता.  त्यानंतर कांबळीची जामिनावर सुटका करण्यात आली होती. 

विनोद कांबळी हा भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा खूप चांगला मित्र आहे. कांबळीने भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९९३ ते २००० पर्यंत त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने कसोटीत ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यात त्याने ३२.५९ च्या सरासरीने एकूण २४७७ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

"ती फक्त अंडी खाऊन जगत होती" परवीनच्या अखेरच्या दिवसाबाबत पूजा बेदीचा खुलासा; FBI ची भीती आणि एकटेपणा

Solapur Accident:'ट्रकच्या धडकेनंतर कार अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार'; सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील घटना

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

SCROLL FOR NEXT