barcelona  Sakal
क्रीडा

मेस्सीशिवाय बार्सिलोना अधूरी; 17 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचा होता.

सुशांत जाधव

Champions League : पाच वेळचा युरोपीय चॅम्पियन बार्सिलोना 17 वर्षांत पहिल्यांदाज चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या नॉक आउट राउंडमध्ये पोहचण्यात अपयशी ठरलाय. बार्सिलोना संघाला ग्रुप E मधील आपल्या अखेरच्या लढतीत बायर्न म्युनिख संघाकडून एकहाती पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात त्यांना एकही गोल करता आला नाही. म्युनिखच्या 3-0 विजयासह बार्सिलोनावर 17 वर्षांत पहिल्यांदाच नॉक आउट राउंडमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचा होता.

बार्सिलोनाचा संघ बायर्न आणि बेनफिका यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर राहिला. बेनफिका संघाने डायनमो कीवला 2-0 असे पराभूत करत अंतिम-16 मध्ये प्रवेश निश्चित केला. यापूर्वी 2004 मध्ये बार्सिलोनाच्या संघावर अशी वेळ आली होती. या वेळीच्या हंगामात त्यांना अंतिम 16 मध्ये स्थान मिळाले नव्हते. दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं बार्सिलोनाची साथ सोडल्यापासून संघाच्या कामगिरीवर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसते. बार्सिलोनाचा संघ आतापर्यंत सर्वाधिक बॅडपॅचमधून जात आहेय ला लिगा स्पर्धेत बार्सिलोनाला 15 पैकी केवळ 6 सामन्यात विजय मिळाला होता.

8 मिनिटांत दोन गोल

बायर्न म्युनिख संघाने 28 मिनिटांत 3 गोल डागले. थॉमस मूलरने 34 व्या मिनिटाला पहिला गोल डागून संघाला आघाडी मिळवून दिली. 43 व्या मिनिटाला लेरॉय साने याने ही आघाडी भक्कम केली. 62 व्या मिनिटाला जमाल मुसियालाने तिसरा गोल डागला. म्युनिखने या लढतीसह सलग सहा विजयाची नोंद केली. एवढेच नाही तर संघाने सलग 28 लीग लढतीमध्ये गोल करुन दाखवले आहेत. बायर्नने 16 फेब्रुवारी 2019 मध्ये लिवरपूल विरुद्ध गोलशून्य बरोबरी केली होती. त्यानंतरच्या प्रत्येक लढतीत त्यांनी गोल डागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

Drunk Police Officer : मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने सहा जणांना उडवलं!, जमावाने बेदम चोपलं

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

SCROLL FOR NEXT