Champions League ESAKAL
क्रीडा

UEFA Champions League : स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या PSG ला Bayern Munich ने चारली पराभवाची धूळ

अनिरुद्ध संकपाळ

Champions League : चॅम्पियन्स लीगच्या राऊंड ऑफ 16 मध्ये बायरेन म्युनिचने बलाढ्या अशा पॅरिस सेंट जर्मनचा 1 - 0 असा पराभव केला. त्याचबरोबर एसी मिलानने देखील टॉटनहमवर 1 - 0 असा विजय मिळवला. बायरेन म्युनिचकडून दुसऱ्या हाफमध्ये अल्फान्सो डेव्हियेसच्या सहाय्याने किंग्जले कोमॅनने पीएसजीवर गोल केला. किग्जले हा यापूर्वी पीएसजीकडूनच खेळत होता. त्याने आपल्या जुन्या क्लबविरूद्ध गोल करत म्युनिचला विजय मिळवून दिला.

पीएसजीकडून किलियान एम्बाप्पेने दुखापतीतून सावरत पुनरागमन केले. त्याचे हे पुनरागमन यशस्वी ठरले असते. त्याने जवळपास गोल करत बायरेनसोबत बरोबरी साधली होती. मात्र व्हीएआर मध्ये एम्बापेचा गोल अवैध ठरवण्यात आला. बायरेन म्युनिचचा हा विजय शानदार विजय म्हणावा लागले. कारण त्यांना बेंजामिन पावर्डशिवाय सामना खेळावा लागला होता. बेंजामिनला मेस्सीला अवैधरित्या अडवल्याप्रकरणी दुसरे यलो कार्ड मिळाले होते. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

दुसरीकडे एसी मिलानने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. त्यांनी टॉटेनहमवर 1 - 0 असा विजय मिळवला. सामन्याच्या सातव्या मिनिटालाच ब्राहिम डिआझने गोल करत आघाडी घेतली होती. टॉटनहमला या गोलची परतफेड करण्याच्या अनेक संधी मिळाल्या मात्र त्यांना त्याचे रूपांतर गोलमध्ये करता आले नाही. एरिक डिएर देखील सलग दोन यलो कार्ड मिळाल्यामुळे बाहेर गेला.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT