Chelsea Russian owner Roman Abramovich Handed Over stewardship  esakal
क्रीडा

रशियन अ‍ॅब्रामोव्हिच यांनी चेल्सी क्लबचे सोडले 'पालकत्व'

अनिरुद्ध संकपाळ

युरोपियन फुटबॉल लीगमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचे (Chelsea Football Club) रशियन मालक रोमन अ‍ॅब्रामोव्हिच (Roman Abramovich) यांनी क्लबचे पालकत्व सोडण्याचा निर्णय घेतला. रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia Invasion In Ukraine) केल्यानंतर ब्रिटीश सरकारने रशिवार अनेक निर्बंध लादले. दरम्यान, ब्रिटनमधील खासदार ब्रायंट यांनी अ‍ॅब्रामोव्हिच यांची संपत्ती जप्त करून त्यांना चेल्सीच्या फुटबॉल क्लबची मालकी (Ownership) देखील सोडण्यास भाग पाडावे अशी मागणी संसदेत केली होती. त्यांनी अ‍ॅब्रामोव्हिच भ्रष्टाचाराचे देखली आरोप केले होते.

रोमन अ‍ॅब्रामोव्हिच यांनी 2003 मध्ये चेल्सीची मालकी मिळवली होती. त्यांनी आता या क्लबचे पालकत्व (Stewardship) सोडताना प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात रशिया युक्रेन युद्धाबाबत एक चकार शब्दही काढला नाही. ते आपल्या वक्तव्यात म्हणतात, 'मी चेल्सीचा 20 वर्ष मालक आहे. या काळात मी या संघासाठी कायम पालकत्वाची भुमिका बजावली. या काळात आम्ही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले आणि आज आम्ही यशस्वी देखील झालो आहोत. आम्ही यावेळी भविष्याचा देखील वेध घेण्याचा प्रयत्न केला. मी या क्लबमार्फत समाजासाठी एक सकारात्मक भुमिका बजावली.'

ते पुढे म्हणाले की, 'मी क्लबच्या भल्यासाठी ह्रदयापासून काम केले. क्लबच्या मुल्यांसाठी कायम प्रतिबद्ध राहिलो आहे. म्हणूनच आज मी चेल्सी फुटबॉल क्लबचे पालकत्व क्लबचे ट्रस्टी चेल्सी चॅरिटेबल फाऊंडेशनकडे (Chelsea’s charitable Foundation) सोपवत आहे. मला असे वाटते की क्लब, खेळाडू, स्टाफ आणि चाहत्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी सध्याचा ते एक चांगला पर्याय आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT