Chess Olympiad 2022 sakal
क्रीडा

Chess Olympiad 2022: विक्रमी 187 देशांचा सहभाग; भारताचे सर्वाधिक सहा

भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत १८७ देशांचा विक्रमी सहभाग असणार आहे.

Kiran Mahanavar

Chess Olympiad 2022 : भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत १८७ देशांचा विक्रमी सहभाग असणार आहे. यात यजमान भारताचे सर्वाधिक सहा संघ खेळणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते १० ऑगस्टदरम्यान होत आहे.

भारताच्या सहा संघांमधील एकूण ३० भारतीय खेळाडू (तीन खुल्या आणि तीन महिला) यामध्ये सहभागी होतील. प्रत्येक संघात ५ सदस्य असतील, त्यापैकी चार प्रत्येक फेरीत मैदानात उतरवले जातील. ऑलिंपियाड ही ११ फेऱ्यांची स्विस लीग स्पर्धा असेल. ऑलिंपियाडमध्ये यजमान देश दोन संघ मैदानात उतरवू शकतो, परंतु एकूण संघांची संख्या विषम असल्याने भारत दोन्ही श्रेणींमध्ये अतिरिक्त संघ उतरवू शकतो.

तीन भारतीय खुल्या संघांना अनुक्रमे २ रे, ११ वे आणि १७ वे मानांकन आहे. योगायोगाने खुल्या संघातील सर्व १५ खेळाडू ग्रँडमास्टर आहेत. महिला विभागात, भारत- १ संघाला प्रथम; तर भारत- २ आणि भारत- ३ संघांना अनुक्रमे ११ वे आणि १६ वे मानांकन मिळाले आहे. ‘ट्रॉम्सो’, नॉर्वे येथे झालेल्या २०१४ चेस ऑलिंपियाडमध्ये भारताने खुल्या गटात ब्राँझपदक जिंकले होते. २०२० मध्ये कोरोनामुळे आभासी पद्धतीने झालेल्या ऑलिंपियाडमध्ये भारताने संयुक्त सुवर्णपदक जिंकले होते; तर २०२१ च्या आभासी ऑलिंपियाडमध्ये भारताने ब्राँझपदक जिंकले होते.

  • भारताचे संघ - पुरुष : भारत १ (२ रे मानांकन)- विदित गुजराथी, पी. हरिकृष्णा, अर्जुन एरिगाईसी, एस. एल. नारायण आणि शशिकरण कृष्णन.

  • भारत २ (११वे मानांकन) : निहाल सरीन, डी. गुकेश, बी. अधिबान, आर. प्रज्ञानंद आणि रौनक साधवानी.

  • भारत ३ (१७ वे मानांकन) : सूर्य शेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन, अभिजित गुप्ता, कार्तिकेयन मुरली आणि अभिमन्यू पुराणिक.

  • महिला : भारत १ (१ ले मानांकन)- कोनेरू हंपी, डी. हरिका, आर. वैशाली, तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी.

  • भारत २ (११ वे मानांकन) : वंतिका अग्रवाल, सौम्या स्वामिनाथन, मेरी अॅन गोम्स, पद्मिनी राऊत आणि दिव्या देशमुख.

  • भारत ३ (१६ वे मानांकन) : ईशा करावडे, साहित्य वार्शिनी, प्रत्युषा बोड्डा, नंदीधा पी.व्ही. आणि विश्ववासनावाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: सडकी सुपारी विक्रेत्यांच्या सिंडीकेटवर वार; गुन्हेशाखेची कारवाई, चार गोदामांवर छापा, ९० लाखांची सुपारी जप्त

Location Tracker : मोबाईलमधलं 'हे' App ट्रॅक करतंंय तुमचं लोकेशन? जाणून घ्या एका क्लिकवर..

Winter Joint Pain : थंडीमुळे हात-पाय आखडले? सांधेदुखीवर रामबाण उपाय जाणून घ्या!

Sankashti Chaturthi 2025: ८ कि ९ नोव्हेंबर कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

'16 महिन्यांपासून मी गरोदर?' सोनाक्षी सिन्हा प्रेग्नेंसीच्या चर्चेवर म्हणाली...'लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मी गरोदर...'

SCROLL FOR NEXT