Chess Olympiad India Opening Ceremony From Chennai Mahabalipuram esakal
क्रीडा

Chess Olympiad : नयनरम्य उद्घाटन सोहळा; मोदींचे आगमन

अनिरुद्ध संकपाळ

महबलीपुरम : तामिळनाडू येथील महाबलीपूरम येथे आजपासून सुरू होणाऱ्या चेस ऑलिम्पियाड (Chess Olympiad) स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरू झाला आहे. या उद्घाटन सोहळ्याला (Opening ceremony) तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन रजनीकांत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ प्रेक्षकांचे अभिवादन स्विकारले. चेन्नईच्या (Chennai) जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर भारतीय संघाचे आगमन होताच प्रेक्षकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. सोहळ्याला सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली.

बुद्धिबळातील ऑलिंपिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑलिंपियाड स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. आत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तामिळनाडू मधील महाबलीपुरम येथे ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार असून यामध्ये यजमान भारताला विजेतेपदाची सुवर्णसंधी असणार आहे. भारताचे सहा संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. भारताला अमेरिका, नॉर्वे, अझरबैझान या देशांतील बुद्धिबळपटूंचे आव्हान असणार आहे.

या स्पर्धेमधील खुल्या गटात 188 तर महिला गटात 162 संघ सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये खुल्या गटात 183 देशांचे, तर महिला गटात 160 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतामध्ये पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाडचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT