Chetan Sharma 
क्रीडा

Chetan Sharma : स्टिंग ऑपरेशनमुळे राजीनामा देणारा चेतन शर्मा पुन्हा बनला सिलेक्टर, फ्लॉप खेळाडूला बनवले कर्णधार

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 15 खेळाडू अन् 8 स्टँडबाय खेळाडूंची केली निवड

Kiran Mahanavar

Chetan Sharma Duleep Trophy : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्माने काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या स्टिंग ऑपरेशननंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बोर्डाने अद्याप मुख्य निवडकर्त्याची घोषणा केलेली नाही. मात्र याचदरम्यान राजीनामा देणारे चेतन शर्मा पुन्हा एकदा निवडकर्ता म्हणून परतला आहेत.

28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी चेतन शर्मा निवडकर्ता म्हणून परतला आणि त्याने उत्तर विभागाचा संघही निवडला. बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चेतन शर्माने हरियाणाचे प्रतिनिधित्व केले आणि उत्तर विभागाचा संघ निवडला.

15 जून रोजी गुरुग्राम क्रिकेट मैदानावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने उत्तर विभागातून 15 खेळाडूंची निवड केली आहे. याशिवाय या संघात आठ स्टँडबाय खेळाडूंचीही निवड झाली.

दुलीप ट्रॉफी 28 जून ते 16 जुलै दरम्यान बेंगळुरू येथे होणार आहे. यासाठी पॅनेलने उत्तर विभागाचा कर्णधार म्हणून अशा खेळाडूची निवड केली, ज्याची कामगिरी यापूर्वी आणि आयपीएल 2023 मध्ये खूपच खराब राहिली आहे.

चेतन शर्मा पुन्हा मुख्य निवडकर्ता होणार?

चेतन शर्माने टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता म्हणून तीन वर्षे काम केले आहे. एक टर्म संपल्यानंतर त्यांना पुन्हा मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले. त्यानंतर स्टिंगच्या वादात त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून शिब सुंदर दास बीसीसीआयच्या अंतरिम मुख्य निवडकर्त्याची भूमिका बजावत आहेत.

बीसीसीआयने अद्याप नवीन मुख्य निवडकर्त्यासाठी अर्ज मागवलेले नाहीत. आता प्रश्न असा आहे की चेतन शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल का? की बीसीसीआय शिब सुंदर दास यांच्यासोबत पुढे जाईल. सध्या निवडकर्त्यांबाबतचे चित्र स्पष्ट नाही. आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठीही टीम इंडियाची घोषणा होणार आहे. आता मंडळ काय निर्णय घेते ते पाहावे लागेल.

उत्तर विभागाच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर आयपीएलच्या एका फ्लॉप खेळाडूला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. पंजाबच्या मनदीप सिंगने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले. त्याने संपूर्ण हंगामात 3 सामने खेळले आणि केवळ 14 धावा केल्या ज्यात एक शून्याचा समावेश होता.

याशिवाय 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्याने केवळ तीन सामने खेळले आणि केवळ 18 धावा केल्या. 2012 मध्ये मनदीपने आयपीएलच्या संपूर्ण हंगामात 432 धावा केल्या होत्या. तेव्हापासून त्याला कधीही 300 धावांचा आकडा गाठता आलेला नाही. सध्या त्यांच्याकडे उत्तर विभागाची जबाबदारी आली आहे. तो संघाला किती पुढे नेऊ शकतो हे पाहावे लागेल.

उत्तर विभागाचा 15 जणांचा संघ : मनदीप सिंग (कर्णधार), प्रशांत चोप्रा, ध्रुव शोरे, अंकित कलसी, प्रभसिमरन सिंग, अंकित कुमार, पुलकित नारंग, निशांत सिंधू, मनन वोहरा, जयंत यादव, बलतेज सिंग, वैभव अरोरा, हर्षित राणा, सिद्धार्थ कौल, आबिद मुश्ताक.

स्टँडबाय खेळाडू : मयंक डागर, मयंक मार्कंडे, रवी चौहान, अनमोल मल्होत्रा, नेहल वढेरा, दिवेश पठानिया, दिविज मेहरा, कुणाल महाजन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT