Chetan Sharma Sting Operation Rohit Sharma Captaincy esakal
क्रीडा

Chetan Sharma Sting Operation : संपलं सगळं! चेतन शर्मा म्हणाले आराम देण्याच्या बहाण्याने रोहितचा...

अनिरुद्ध संकपाळ

Chetan Sharma Sting Operation Rohit Sharma Captaincy : भारतीय वरिष्ट पुरूष क्रिकेट संघाचे निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा यांचे एक स्टींग ऑपरेशन बाहेर आले आहे. या स्टींग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या टी 20 कारकिर्दिबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचबरोबर रोहित शर्माच्या टी 20 कॅप्टन्सीबाबत देखील मोठे वक्तव्य केले आहे.

चेतन शर्मा यांनी सांगितले की रोहित शर्माला आता भारताच्या टी 20 संघात समाविष्ट करण्यात येणार नाहीये असे धक्कादायक वक्तव्य केल. याचबरोबर झी न्यूजने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी सांगितले की, हार्दिक पांड्याला टी 20 चा कर्णधार करण्यात येईल. रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी 20 मधून पत्ता कट करण्यात येईल. चेतन शर्मांनीच अशी वक्तव्ये केल्याने हे प्रकरण गंभीर होत आहे.भारती

रोहित शर्माची टी 20 कारकिर्द संपल्यात जमा असल्याचे वृत्त यापूर्वी देखील माध्यमांमध्ये आले आहे. मात्र रोहितने सांगितले होते की तो अजूनही टी 20 चा कर्णधार आहे. आता चेतन शर्मांच्या नव्या वक्तव्यामुळे रोहित शर्मा तोंडघशी पडला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसातच ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या शेवटच्या दोन कसोटींसाठी भारतीय संघांची घोषणा अजून व्हायची आहे. त्यापूर्वीच हे स्टिंग ऑपरेशन आल्यामुळे आता बीसीसीआय याबाबत काय निर्णय घेते हे महत्वाचे ठरणार आहे.

जर चेतन शर्मा पदावर राहिले तर ते रोहित शर्माला कसे फेस करणार? या प्रकरणावर बीसीसीआय कशी प्रतिक्रिया देते हेही उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातच रोहित शर्माला दुसऱ्या कसोटीपूर्वी माध्यमांना सामोरे जावे लागणार आहे. यावेळी रोहितला या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. रोहित हा बाऊन्सर कसा चुकवतो... की नाईट वॉचमन म्हणून दुसऱ्या कोणाला तरी पत्रकार परिषदेला पाठवतो हे पहावे लागले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना ३००० रुपयांचा दिलासा; पण पैसे कुणाच्या खात्यात जमा झाले कुणाच्या नाही?

Silver Import: सोनेनंतर आता चांदीवरही केंद्र सरकारचा मोठा निर्णय! नवे नियम लागू केले; आता अतिरिक्त मंजुरी लागणार

KKR vs GT: 22 Sixes...! फिन ऍलेन, रघुवंशीची वादळी खेळी, पण शतक हुकलं; कोलकाताने IPL 2026 मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रमक केला

Electric Scooter : फक्त 1 रुपयांत 4 कि.मी. प्रवास; किंमत 45 हजार, 'ही' आहे सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

Junnar Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून; पत्नीने आत्महत्या केल्याचा पतीने रचला बनाव

SCROLL FOR NEXT