Cheteshwar Pujara Ajinkya Rahane Future Deciding Ranji Trophy Match  esakal
क्रीडा

Ranji Trophy: पुजारा-रहाणेचे भवितव्य ठरवणारा सामना सुरू

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद: भारतातील प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी रणजी स्पर्धा (Ranji Trophy) तब्बल दोन वर्षांनंतर आजपासून खेळवण्यात येणार आहे. यंदा ३८ संघांमध्ये जेतेपदासाठी झुंज रंगेल. तमाम क्रिकेटप्रेमींना ६५ सामन्यांची झुंज पाहायला मिळेल. मात्र यातील सौराष्ट्र आणि मुंबईमधील (Saurashtra vs Mumbai) सामन्याला रणजी फायनलपेक्षाही जास्त महत्व आले आहे. कारण हा सामना भारतीय संघातील दोन अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेचे भवितव्य ठरवणार आहे. हा सामना अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजपासून सुरू होत आहे. (Cheteshwar Pujara Ajinkya Rahane Future Deciding Ranji Trophy Match)

मुंबई व सौराष्ट्र हे दोन्ही संघ एकाच म्हणजेच ड गटात आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) सुमार फॉर्ममधून जाणाऱ्या अजिंक्य व चेतेश्‍वर या दोघांसाठीही सलामीचीच लढत महत्त्वाची ठरणार आहे. भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये ४ ते ८ मार्च व १२ ते १६ मार्च यादरम्यान दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारताची राष्ट्रीय निवड समिती लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.

त्याआधी रणजी स्पर्धेतील सलामीची लढत खेळवण्यात येणार आहे. मुंबई-सौराष्ट्र यांच्यामधील लढतीत अजिंक्य व चेतेश्‍वर या दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंचा कस लागेल हे निश्‍चित. कारण कसोटीतील स्थान कायम राखण्यासाठी दोन्ही खेळाडूंना रणजी लढतीत मोठी खेळी करावीच लागणार आहे; अन्यथा कसोटी क्रिकेटसाठी भारतीय संघात स्थान कायम राखण्याच्या त्यांच्या आशांवर पाणी फेरले जाईल.

रणजी स्पर्धेची गटवारी (एलिट)

अ : गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय

ब : बंगाल, बडोदा, हैदराबाद, चंडीगड

क : जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पुद्दुचेरी, रेल्वे

ड : गोवा, मुंबई, ओडिसा, सौराष्ट्र

इ : आंध्र, राजस्थान, सर्व्हिसेस, उत्तराखंड

फ : हरयाना, हिमाचल प्रदेश, पंजाब, त्रिपुरा

ज : आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, विदर्भ

ह : छत्तीसगढ, दिल्ली, झारखंड, तमिळनाडू

प्लेट

अरुणाचल प्रदेश, बिहार, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम

या नऊ ठिकाणी होणार लढती

राजकोट, कटक, चेन्नई, अहमदाबाद, त्रिवेंद्रम, दिल्ली, हरयाना, गुवाहाटी, कोलकाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT