Cheteshwar Pujara 
क्रीडा

WI vs IND Cheteshwar Pujara : टीम इंडियातून वगळल्यानंतर पुजाराने घेतला मोठा निर्णय

निवडकर्त्यांनी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला अन्...

Kiran Mahanavar

WI vs IND Cheteshwar Pujara : भारतीय संघाचा कसोटी दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजाराचा वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. पुजाराला अलीकडच्या काळात टीम इंडियासाठी काही खास कामगिरी करता आली नाही, त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय संघातून बाहेर पडताच चेतेश्वर पुजाराने देशांतर्गत संघाचा हात धरला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियातून वगळलेला चेतेश्वर पुजारा आता दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. पुजाराने पश्चिम विभागाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पुजारासह सूर्यकुमार यादवही पश्चिम विभागीय संघात सामील होणार आहे. हे दोन्ही खेळाडू प्रियांक पांचाळच्या नेतृत्वाखाली दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाकडून खेळतील. त्याचबरोबर या ट्रॉफीनंतर चेतेश्वर पुजारा इंग्लिश कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाऊ शकतो.

बेंगळुरू येथे 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या दिवशी मध्य विभागाचा सामना पूर्व विभागाशी होणार आहे. त्याचवेळी उत्तर विभागाचा सामना उत्तर-पूर्व विभागाच्या संघाशी होणार आहे. मध्य विभाग आणि पूर्व विभाग यांच्यातील सामना अलूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल, तर उत्तर विभाग आणि उत्तर-पूर्व विभागाचा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल.

उत्तर-पूर्व विभाग हा देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेतील नवीन आणि सहावा संघ आहे. हे दोन्ही सामने उपांत्यपूर्व फेरीसारखे असतील. त्याचबरोबर गेल्या मोसमातील विजेते पश्चिम विभाग आणि उपविजेत्या दक्षिण विभागाच्या संघांना उपांत्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. 12 जुलै रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, अजिंक्य. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT