Cheteshwar Pujara Test Cricket Record
Cheteshwar Pujara Test Cricket Record  esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara : अर्धशतक हुकले मात्र पुजाराने विराटला जमलं नाही ते करून दाखवलंय!

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara Test Cricket Record : बॉर्डर - गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना दमदार प्रदर्शन केले. सलामीवीर शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमधील आपले दुसरे शतक ठोकत भारताला पहिल्या डावात चांगल्या स्थितीत पोहचवले. रोहित शर्मा 35 धावांवर बाद झाल्यानंतर शुभमन गिलला चेतेश्वर पुजाराने चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली.

चेतेश्वर पुजाराने सावध फलंदाजी करत 121 चेंडूत 42 धावा केल्या. मात्र त्याला टॉड मर्फीने 42 धावांवर पायचीत करत भारताचा 187 धावांवर दुसरा धक्का दिला. चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक आठ धावांनी हुकले.

मात्र जरी पुजाराचे अर्धशतक हुकले असले तरी त्याने आज एक मोठा माईल स्टोन पार केला. त्याने अशी कामगिरी केली आहे जी कामगिरी करणे अजून विराट कोहलीला देखील जमलेली नाही.

चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरूद्ध आपल्या 2000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. तो आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2000 धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास क्लबमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे सध्या खेळत असलेल्या फलंदाजांपैकी ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांमध्ये पुजारा अव्वल स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत जॅक हॉब्ज (3636 धावा) पहिल्या स्थानावर आहेत. यानंतर भारताच्या मास्टर ब्लास्टरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 3630 धावा केल्या आहेत.

चेतेश्वर पुजाराने भारताकडून आतापर्यंत 101 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 43.90 च्या सरासरीने 7112 धावा केल्या आहेत. 35 वर्षाच्या पुजाराने आपल्या कारकिर्दीत 19 शतक आणि 35 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने कसोटीत नाबाद 206 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT