WI vs IND Cheteshwar Pujara | Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळल्याबद्दल निवड समितीवर सडकून टीका केल्या जात आहे. गावसकर म्हणतात पुजाराला बळीचा बकरा का बनवला? प्रत्येकाला संघातून वगळण्यासाठी निकष सारखाच असायला हवा.
भारताला पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या 16 सदस्यीय भारतीय कसोटी संघात पुजाराला स्थान मिळालेले नाही. पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपल्याचे मानले जात आहे.
चेतेश्वर पुजाराला संघातून वगळल्याची बातमी ऐकून आश्चर्यचकित झाल्याचे सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स टूडेशी बोलताना सांगितले की, 'फक्त पुजारालाच बळीचा बकरा का बनवण्यात आला? त्याने काय चूक केली जी बाकीच्या खेळाडूंनी केली नाही. का फक्त त्याचाच बळी दिला गेला. त्याच्याकडे असे लोक किंवा त्याचे माध्यमांमध्ये लाखो चाहते नाहीत, जे बाहेरून घोषणा देतात म्हणून तुम्ही त्याला वगळले. संघातून वगळण्याचा काही निकष असेल तर तो फक्त एकासाठी नसून सर्वांसाठी असावा.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अजिंक्य रहाणे वगळता इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. पुजाराने WC फायनलच्या पहिल्या डावात 14 तर दुसऱ्या डावात 27 धावा केल्या. गावसकर म्हणाले की, त्यांनी अनेक वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली असून तो एक महान खेळाडू आहे.
गावसकर यांच्या म्हणण्यानुसार, निवडकर्त्यांनी संघात युवा खेळाडूंना संधी द्यायची असेल, तर अनुभवी विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजासारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती द्यायला हवी होती. पण त्यांची लाखो फॉलोवर्स असल्यामुळे त्यांना काढत नाही.
वर्षाच्या शेवटी एकदिवसीय विश्वचषक होणार असून हे सर्व खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत. टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंना आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये नव्याने मैदानात उतरता यावे म्हणून त्याला विश्रांती द्यायला हवी होती. डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी पुजाराने कौंटीमध्ये धावांचा डोंगर उभा केला होता, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात तो अपेक्षेप्रमाणे उभा राहू शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.