Cheteshwar Pujara 100th Test  esakal
क्रीडा

Cheteshwar Pujara 100th Test : पुजाराने शंभराव्या कसोटीपूर्वी घेतला 'विशेष' आशीर्वाद; BCCI नेही केले रिट्विट

अनिरुद्ध संकपाळ

Cheteshwar Pujara 100th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडियमवर खेळणार आहेत. हा सामना 17 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. हा कसोटी सामना WTC फायनलच्या दृष्टीकोणातून भारतासाठी महत्वाचा आहेच.

मात्र याचबरोबर हा कसोटी सामना भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे. कारण हा त्याचा 100 वा कसोटी सामना आहे. या विशेष कसोटीपूर्वी चेतेश्वर पुजाराने एका खास व्यक्तीचा आशीर्वाद घेतला. चेतेश्वर पुजाराने नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जावून भेट घेतली. याबाबचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेतेश्वर पुजारा आणि त्याची पत्नी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. दिल्ली कसोटी ही पुजाराची 100 वी कसोटी आहे. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुजाराने शेअर केलेल्या ट्विटवर उत्तर दिले. ते म्हणाले की, 'आज तुला आणि पुजाला भेटून आनंद झाला. तुझ्या कारकिर्दीतील 100 व्या कसोटीसाठी शुभेच्छा.'

बीसीसीआयने पंतप्रधानांचे हे ट्विट आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रिट्विट केले.

दरम्यान, चेतेश्वर पुजाराने पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर या भेटीचे फोटो शेअर करत ट्विट केले की, 'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेण्याचे भाग्य मला मिळाले. त्यांच्याशी केलेले संभाषण आणि माझ्या 100 व्या कसोटीसाठी त्यांनी वाढवलेला माझा उत्साह यामुळे मी आनंदीत झालो आहे. पीएमओ इंडियाचे आभार!'

भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत 4 सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मात्र दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा आणि निवडसमितीसाठी संघ निवड हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT